पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला पसंती 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 September 2017

पुणे : गणेशोत्सव सुरू झाल्यापासून सात दिवसांत 64 हजार 920 मूर्तींचे हौद आणि टाक्‍यांतील पाण्यात विसर्जन झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सातव्या दिवसापर्यंत हौद, टाक्‍यांमध्ये विसर्जित मूर्तींची संख्या 14 हजारांनी वाढली असून, गुरुवारी (ता. 31) दिवसभरात ही संख्या 48 हजार 396 एवढी होती. गेल्या वर्षी अनंत चतुर्दशीपर्यंत सुमारे 2 लाख 5 हजार 94 मूर्तींचे अशाप्रकारे विसर्जन झाले होते.

नदीऐवजी हौद, टाक्‍यांतील पाण्यात श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे पुणेकरांचा कल वाढल्याने यंदा ही संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. 

नदीऐवजी हौदातील पाण्यात श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करावे, यासाठी गेल्या काही वर्षांपासून महापालिका, तसेच गणेश मंडळांतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. मूर्तीचे पावित्र्य राखले जावे, या उद्देशाने बहुतांश नागरिक आता हौदाकडेच वळू लागले आहेत. महापालिकेच्या पंधरा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 239 ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली असून, घाटांवर निर्माल्य कलशही ठेवले आहेत.

नागरिकांनी घरच्या घरी बादलीतल्या पाण्यात श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करावे, यासाठी महापालिकेतर्फे अमोनिअम बाय कार्बोनेट पावडर मोफत वाटण्यात येते. गेल्या वर्षी 24 हजार 250 नागरिक सुमारे 55 टन पावडर घेऊन गेले. त्यामुळे घरच्या घरी श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करणाऱ्यांची संख्याही उल्लेखनीय असल्याचे स्पष्ट होत आहे. 

महापालिकेतर्फे यंदाही घाटांवर हौद बांधण्यात आले आहेत. तसेच, लोखंडी टाक्‍याही ठेवण्यात आल्या आहेत. नदीपात्रात श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करणाऱ्यांची संख्या घटू लागली आहे. यंदाच्या वर्षी गेल्या सात दिवसांत फक्त 22 हजार 429 मूर्तींचे नदीपात्रात, 13 हजार 392 मूर्तींचे कॅनॉलमध्ये विसर्जन झाले. हौदातील पाण्यात श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करणाऱ्या नागरिकांना गुलाबाचे फूल देऊन विविध राजकीय पक्ष, तसेच सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे स्वागत करण्यात येत होते. 

याबाबत महापालिकेचे उप-आरोग्य निरीक्षक पपीचंद श्रीश्रीमाळ म्हणाले, ""पंधरा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत घाटांवर हौद बांधण्यात आले आहेत. टाक्‍यांचीही सोय केली आहे. काही ठिकाणी निर्माल्य कलशही ठेवले आहेत. बहुतांश नागरिक हौदातील पाण्यातच श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करणे पसंत करत आहेत. परिणामी, नदीचे प्रदूषणही कमी होत असून, पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या दृष्टीने ही चांगली बाब आहे.''

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival 2017 Pune Ganesh Utsav