पोलिस कर्मचाऱ्यांना चिक्कीवाटप

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 September 2018

पुणे - गणेशोत्सवात पोलिस कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी ‘सकाळ’ व ‘रोटरी क्‍लब ऑफ पुणे रॉयल’ यांच्यातर्फे ‘तंदुरुस्त बंदोबस्त’ उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो. याअंतर्गत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या मांडवात पोलिस कर्मचाऱ्यांना सहपोलिस आयुक्त शिवाजी बोडखे यांच्या हस्ते नुकतेच चिक्कीवाटप करण्यात आले. 

या वेळी बोडखे यांच्या हस्ते ‘श्रीं’ची आरती करण्यात आली. त्यानंतर श्रीगणरायाच्या नावाचा गजर करत भाविकांच्या उपस्थितीत चिक्कीवाटप 
करण्यात आले. परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त सुहास बावचे, फरासखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर नावंदे, संभाजी शिर्के, ‘फ्रेशक्‍लिक पिझ्झा अँड पास्ता’च्या निधी सरदेसाई, रोटरी क्‍लब ऑफ पुणे रॉयलचे अध्यक्ष गिरीश देशपांडे, दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळाचे हेमंत रासने, महेश सूर्यवंशी, उल्हास भट, उदय कुलकर्णी, प्रशांत देशपांडे, शोभा नहार, अजय चौधरी आदी उपस्थित होते.

गणेशोत्सवामध्ये पोलिस कर्मचारी चोवीस तास बंदोबस्तामध्ये व्यस्त असतात. अशा वेळी त्यांना सातत्याने ऊर्जा मिळणे आवश्‍यक आहे. ‘तंदुरुस्त बंदोबस्त’ उपक्रमामुळे पोलिसांना काम करण्यासाठी अधिक ऊर्जा मिळणार आहे.
- शिवाजी बोडखे, सहपोलिस आयुक्त

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Chikki Distribution Tandurust bandobast Ganeshotsav