esakal | सोनम पाटील ठरली ‘मिस व्हीलचेअर’

बोलून बातमी शोधा

 Sonam Patil from junnar became Miss Wheelchair}

धामणखेल (ता. जुन्नर) येथे दिव्यांग बांधवांसाठी माय अक्टिव्हिटी सेंटर संचलित नंदनवन ही संस्था कार्य करत असून सोनम या संस्थेची विद्यार्थिनी आहे. नवसृजन संस्थेमार्फत दिव्यांगासाठीविविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

सोनम पाटील ठरली ‘मिस व्हीलचेअर’
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जुन्नर : दिव्यांगांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नवी दिल्ली येथे नवसृजन संस्थेमार्फत आयोजित केलेल्या कार्यक्रमात जुन्नर तालुक्यातील सोनम पाटील हिने यावर्षीचा ‘मिस व्हीलचेअर हा किताब पटकावला आहे.

धामणखेल (ता. जुन्नर) येथे दिव्यांग बांधवांसाठी माय अक्टिव्हिटी सेंटर संचलित नंदनवन ही संस्था कार्य करत असून सोनम या संस्थेची विद्यार्थिनी आहे. नवसृजन संस्थेमार्फत दिव्यांगासाठीविविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदा आर्य ऑडिटोरियममध्ये ‘अहसास, फिर मुस्कुरायेगा इंडिया’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नंदनवन संस्थेतील सोनमने लावणी सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. यावेळी नंदनवनचे संस्थापक सचिव विकास घोगरे यांना प्रेरक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मेंदूच्या विकारामुळे सोनमचे दोन्ही पाय निर्जीव झाले. महानगर पालिकेच्या शाळेत इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण कसेबसे झाले. आईच्या मृत्यूनंतर सोनम विविध सामाजिक संस्थांमध्ये राहू लागली. मुळात नृत्याची आवड असल्यामुळे सोनम हातवारे करून टीव्ही समोर नृत्य करत असे. अशातच तिची ओळख विकास घोगरे यांच्याशी झाली. कोरोना काळात सोनम राहत असलेल्या संस्थेने तिला संस्थेतून घरी जायला सांगितले. यावेळी तिला नंदनवन संस्थेने आसरा दिला. संस्थेत ती नृत्याचे धडे घेत असताना दिल्लीतील एका फॅशन शोची माहिती मिळाल्याने सोनमचे नाव नोंदविण्यात आले. विविध पातळी उत्तीर्ण होत सोनम अंतिम फेरीत पोचली आणि सोनमने प्रथम क्रमांक पटकावून २०२१ चा ‘मिस व्हीलचेअर’ बहुमान मिळविला. या कार्यक्रमात देशभरातून विविध मॉडेल्सनी सहभाग घेतला होता. दूरदर्शनचे सहायक संचालक राज पुरोहित, ब्युटी क्वीन तरन्नुम शेख, गौरव शर्मा, मीनाक्षी ठाकूर, मीनाक्षी चौधरी आदी कला क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.