#MarathaKrantiMorcha बारामतीत ठिय्या आंदोलनास सुरवात

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 August 2018

बारामती शहर - मराठा आरक्षणासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने शहरात आठवडाभराच्या ठिय्या आंदोलनास आज प्रारंभ झाला. नगरपालिकेसमोर तीन हत्ती चौकात आज मराठा बांधवांनी सकाळी दहापासूनच हजेरी लावत या आंदोलनात सहभाग नोंदविला. 

या आंदोलनासाठी पोलिसांनी कडक पोलिस बंदोबस्त ठेवला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्यासह राज्य राखीव दलाची तुकडी व मोठ्या प्रमाणावर पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित होते. 

आज सकाळी दहा वाजल्यापासूनच नगरपालिकेसमोरील मांडवामध्ये मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी विविध घटकांतील मान्यवर हजेरी लावत होते. दुपारनंतर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जागरण गोंधळ घातला गेला. आजपासून रविवार वगळता (ता. ५) पुढील बुधवारपर्यंत (ता. ८) ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याचे संयोजकांनी स्पष्ट केले. शुक्रवारपासून (ता. ३) बारामती तालुक्‍याच्या विविध भागांतील मराठा  समाजबांधव या ठिय्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. आज अतिशय शांततेत व शिस्तीमध्ये ठिय्या आंदोलन बारामतीत झाले. 

आज सरकारचा दहावा
मराठा मोर्चाच्या वतीने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अभिनव आंदोलन बारामतीत केले जाणार आहे. शुक्रवारी (ता. ३) सरकारचा दहावा कार्यक्रम आणि सामूहिक मुंडण केले जाणार आहे. शनिवारी (ता. ४) महिलांच्या हस्ते सरकारी वाहनांची पूजा केली जाणार आहे. सोमवारी (ता. ५) अर्धनग्न आंदोलन होणार असून, मंगळवारी (ता. ६) गाजर आंदोलन व दूध अभिषेक घातला जाणार आहे. बुधवारी (ता. ८) तीन हत्ती चौकात मानवी साखळी केली जाणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agitation started by Baramati at the hands of the Sakal Maratha community