
वडापुरी येथील ग्रामपंचायतच्या गाळ्यातील दुकानासह हॉटेल व्यावसायिकानी बंद ठेवण्यात आल्याने; रस्त्यावर व गावात शुकशुकाट दिसत होते.
वडापुरी : वडापुरी (ता. इंदापूर) येथे ता. 9 ला सकल मराठा समाजाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत गावातील असलेली दुकाने व बाजारपेठा 100 टक्के बंद ठेवण्यात आल्या.
वडापुरी येथील ग्रामपंचायतच्या गाळ्यातील दुकानासह हॉटेल व्यावसायिकानी बंद ठेवण्यात आल्याने; रस्त्यावर व गावात शुकशुकाट दिसत होते. आज गुरुवारचा आठवडे बाजार असून सुद्धा या ठिकाणी व्यापारी, भाजीपाला विकणारे शेतकरी सुद्धा न आल्याने दर गुरुवारी भरणारा बाजाराचे मैदान ओसाड दिसत आहे.
महाराष्ट्र बंदला प्रतिसाद देत आज अत्यावश्यक सेवा सोडून गाव पूर्णपणे 100 टक्के बंदला गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला व शांततेत पाळण्यात आला.
आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.