Maratha Kranti Morcha : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग ओस

सचिन लोंढे
Thursday, 9 August 2018

बंदमुळे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे रोडावल्याचे चित्र दिसून येत होते. इंदापूर तालुक्यातील महामार्गाच्या टप्प्यामध्ये महामार्ग पूर्णपणे ओस पडला होता. महामार्गालगतची हाॅटेल बंद असल्याने, अनेक वाहनचालकांचे आज खाण्यापिण्याचे हाल झाले. 

कळस - सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व स्तरांतून सहभाग नोंदविण्यात आला होता. या बंदमुळे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे रोडावल्याचे चित्र दिसून येत होते. इंदापूर तालुक्यातील महामार्गाच्या टप्प्यामध्ये महामार्ग पूर्णपणे ओस पडला होता. महामार्गालगतची हाॅटेल बंद असल्याने, अनेक वाहनचालकांचे आज खाण्यापिण्याचे हाल झाले. 

इंदापूर तालु्क्यामध्ये पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचा सुमारे ४६ किलोमिटचा टप्पा आहे. या टप्प्यात शेकडो शाकाहारी, मासांहारी हाॅटेल, ढाबे आहेत. यापैकी काही हाॅटेल, ढाब्यांवर अधिकृत एसटी थांब्याची सोय आहे. यामुळे याठिकाणी नेहमीच वाहनचालक व प्रवाशांची वर्दळ पहावयास मिळते. मात्र आज एसटी सेवा बंदमध्ये सहभागी झाल्याने दिवसभरात या महामार्गावर एकही एसटीबस आढळून आली नाही. एसटी बरोबरच खासगी प्रवाशी वाहतूकही आज बंद होती. शिवाय अनेकांनी आजचे प्रवासाचे बेत रद्द केल्याने वैयक्तीक प्रवासाची वाहनेही क्वचिकच आढळून येत होती. महामार्गालगतची हाॅटेल बंद असल्याने मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांची आज खाण्यापिण्याची चांगलीच परवड झाली. तर सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून दिवसभर महामार्गावर पोलिसांची गस्त सुरू होती.

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Bandh Pune Solapur National Highway is empty