दिवाळीच्या मुहुर्तावर मराठा समाजाचा स्वतंत्र पक्ष

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 September 2018

आघाडी सरकारने मराठा समाजाची निराशा केल्याने मोठ्या आशेने भाजपा-सेनेला सत्ता दिली होती. पण या युती सरकाने मराठा आरक्षणाबाबत न्यायालयात आपली भुमिका प्रबळपणे मांडली नसल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. कोणताही पक्ष मराठा समजाकडे फक्त निवडणूकापूरतेच पाहतो. पण आता मराठा समाजातील सर्व घटक एकत्र येत नविन पक्ष स्थापण्यात येणार आहे. अशीही माहिती पाटील यांनी दिली.​

पुणे : आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेला मराठा समाज आता मराठा समाजाचा स्वतंत्र पक्ष स्थापण्यासाठी पुन्हा एकत्र आला आहे. दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर मराठा समाजाच्या नवीन पक्षाची स्थापना रायरेश्वराच्या मंदिरामध्ये करण्याची घोषणा मराठा पक्षाचे संयोजक सुरेश पाटील यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत केली. 

आघाडी सरकारने मराठा समाजाची निराशा केल्याने मोठ्या आशेने भाजपा-सेनेला सत्ता दिली होती. पण या युती सरकाने मराठा आरक्षणाबाबत न्यायालयात आपली भुमिका प्रबळपणे मांडली नसल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. कोणताही पक्ष मराठा समजाकडे फक्त निवडणूकापूरतेच पाहतो. पण आता मराठा समाजातील सर्व घटक एकत्र येत नविन पक्ष स्थापण्यात येणार आहे. अशीही माहिती पाटील यांनी दिली.

नव्याने काढण्यात येणाऱ्या पक्षाला कोणीही अध्यक्ष असणार नाही. या पक्षात शंभर जणांची कोअर कमिटी असून त्यात निवृत्त आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. आजी-माजी 20 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा पाटील यांनी केला. त्याचबरोबर प्रस्थापित आमदार आणि खासदार यांना पक्षात प्रवेश दिला जाणार नाही अशी माहितीही त्यांनी दिली. मराठा समाजाचा नविन पक्ष लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूका लढवणार आहे. त्यासाठी उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. पण या पक्षाचे नाव अद्याप जाहिर करण्यात आले नाही. तसेच पक्षाला सरकारची मान्यता अद्याप मिळाली नाही.

उदयनराजे यांना जाहिर पाठिंबा
सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने उमेदवारी दिली किंवा नाही दिली, तरी आमच्या पक्षाचा पाठिंबा त्यांना असेल असे सुरेश पाटील यांनी दिली. त्याचबरोबर उदयनराजे कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढले तरी आम्ही त्यांना पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी जाहिर केले. उदयराजे यांनी या पक्षाचे नेतृत्व करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha community will Form Independent political party on Diwali