पुणे - मराठा आरक्षणासाठी विविध संघटनांनी गुरुवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर सहा मार्गावरील बससेवा बंद, तर आठ मार्गांवरील बस शहराच्या हद्दीपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय पीएमपी व्यवस्थापनाने घेतला आहे. तसेच १४ मार्गांवरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. उर्वरित मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यात येणार आहे. यासाठी भरारी पथकांची नेमणूक केली आहेत. तसेच बसच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आल्याचे सत्रूांनी सांगितले.

संपूर्ण बंद असणारे मार्ग
पुणे-नाशिक रस्ता - या रस्त्यावरील सर्व मार्ग बंद राहणार
निगडी-चाकण - या रस्त्यावरील सर्व मार्ग बंद
एमआयडीसी, वडगाव चाकण रस्ता - या रस्त्यावरील सर्व मार्ग बंद राहणार
पुणे-मुंबई रस्ता - या रस्त्यावरून निगडीच्या पुढे देहूगाव, वडगाव, कामशेत व किवळेकडे जाणारे सर्व मार्ग बंद राहणार.
पौड रस्ता - या रस्त्याने संचलनात असणारे मार्ग फक्त चांदणी चौकापर्यंतच सुरू असणार
सिंहगड रस्ता - वडगाव, धायरीच्या पुढे जाणारे सर्व मार्ग बंद राहणार
अंशत: बंद असणारे मार्ग
मांडवी-बहुली रस्ता - या रस्त्यावरील मार्ग फक्त वारजे-माळवाडीपर्यंतच सुरू असणार
पुणे-सातारा रस्ता. नसरापूर, कोंढणपूर, शिवापूरकडे जाणारे मार्ग फक्त कात्रजपर्यंतच सुरू राहणार
कात्रज-सासवड रस्ता (बोपदेव घाट) - बोपदेव घाटमार्गे जाणाऱ्या सर्व मार्गावरील बस येवलेवाडीपर्यंत सुरू असणार
हडपसर-सासवड रस्ता - या रस्त्यावरील सर्व मार्ग फुरसुंगीपर्यंत सुरू राहणार
पुणे-सोलापूर रस्ता - या रस्त्यावरील सर्व मार्ग शेवाळवाडी आगारापर्यंत सुरू राहणार
पुणे-नगर रस्ता - या रस्त्यावरील मार्ग वाघोलीपर्यंत सुरू राहणार
हडपसर-वाघोली मार्ग - कोलवडी, साष्टेमार्गे जाणारा मार्ग बंद ठेवणार
आळंदी रस्ता - आळंदी ते वाघोली मार्गावरील मरकळचा मार्ग बंद राहणार
एसटी सेवा दिवसभर बंद
एसटी सेवा सुरू ठेवायची की नाही, यावर बुधवारी पाच वाजता विभागीय नियंत्रकांनी आढावा बैठक बोलविली होती. त्यानंतर बुधवारी मध्यरात्रीपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी (ता.९) दिवसभर ही सेवा बंद राहील. बससेवा पूर्ववत कधी करायची, याबाबत रात्री परिस्थितीचा अंदाज घेऊनच निर्णय घेण्यात येईल, असे विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांनी सांगितले.