मराठा क्रांती मोर्चाचे उपोषण स्थगित

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 August 2018

पुणे - मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येत आहे. तसेच, विभागीय स्तरावरील मागण्यांबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे आश्‍वासन विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाचे सुरू असलेले बेमुदत चक्री उपोषण एक महिन्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

मागण्यांसंदर्भात डॉ. म्हैसेकर यांनी पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा आणि सांगली येथील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या वेळी संबंधितांनी मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाचे समन्वयक शांताराम कुंजीर, राजेंद्र कोंढरे, प्रवीण गायकवाड, विकास पासलकर, बाळासाहेब अमराळे, रघुनाथ चित्रे, हणमंत मोटे, रेखा कोंडे, डॉ. सुनीता मोरे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. 

या वेळी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले. 

पूरग्रस्तांसाठी ३३ पोती तांदूळ
आंदोलन सुरू असतानाही मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी माणुसकीचे दर्शन घडविले. केरळमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी शहरातून मदत गोळा करण्यात येत आहे. हे उपोषण स्थगित केल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी डॉ. म्हैसेकर यांच्या उपस्थितीत पूरग्रस्तांसाठी ३३ पोती तांदूळ पाठविला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morcha Maratha Reservation Agitation Stop