Maratha Kranti Morcha: मराठा आरक्षणासाठी स्टंटबाजी आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

पुणे - मराठा समाजाला आरक्षण मिळवे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या व संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी टिळक चौकात बुधवारी सायंकाळी प्रतीकात्मक स्टंटबाजी आंदोलन केले. राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात या वेळी घोषणा देण्यात आल्या.

मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाला ‘स्टंटबाजी’ असे हिणवून काही लोकप्रतिनिधी या आंदोलनाची थट्टा करत असल्याचा आरोपही या वेळी कार्यकर्त्यांनी केला. त्या लोकप्रतिनिधींना स्टंटबाजी काय असते हे दाखवून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात केले. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, विराज तावरे, मराठा क्रांती मोर्चातर्फे बाळासाहेब अमराळे, तुषार काकडे, जितेंद्र कोंढरे, स्मिता म्हसकर आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.

Web Title: maratha kranti morcha maratha reservation agitation Stunt