पुणे : ''मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध मुळीच नाही. मात्र,
ओबीसी मध्ये समाविष्ट करुन मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशी आमची ठाम भूमिका राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनने पत्रकार परिषद दरम्यान मांडली. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळू शकते, कायदेशीर प्रक्रिया करुन, वेगळी सूची तयार करुन मराठा समाजाच्या आरक्षणाचा विचार व्हावा ओबीसी फेडरेशनने सांगितले.

'' मागासवर्गीय आयोगातील सदस्यांमध्ये बहुसंख्य सदस्य हे मराठा समाजातील आहे. ज्या संस्थांच्या माध्यमातून सर्वेक्षण झाले. त्या संस्थापैकी एक संस्था ब्राह्मण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहे. इतर मराठा समाजाशी संबंधित आहे. त्यांनी आतापर्यंत मागासवर्गीयांसाठी कोणतेही काम केलेले नाही. '' , असे सांगत आरक्षणासाठी जो आयोग गठीत केला त्या आयोगावरच ओबीसी फेडरेशनने काही प्रश्न उपस्थित केले आहे.
आधी निष्कर्ष आणि नंतर डेटा अॅनालिसिस अशा पद्धतीने मराठा आरक्षणावर काम झालेले आहे. हे मॅच फिक्सिंग केलेले आहे, म्हणून आमचा याला विरोध आहे. असे ओबीसी फेडरेशनने सांगितले.