#MarathaKrantiMorcha टोळक्याकडून दुकान बंद करण्यासाठी दमदाटी

संदीप घिसे 
Sunday, 29 July 2018

पिंपरी (पुणे) : मराठा मोर्चाच्यावतीने चिंचवडगाव येथे आयोजित केलेली निषेध व श्रध्दांजली सभा शांततेत पार पडली. ही सभा सुरू असतानाच चिंचवडच्या वाल्हेकरवाडी भागात एका टोळक्याने दमदाटी करत व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले. असाच प्रकार काळेवाडी परिसरात सुरू असल्याचे समोर आले आहे. यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने चिंचवड परिसरात बंदचे नियोजन करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी याबाबत मध्यस्थी केल्यानंतर हा बंद मागे घेण्यात आला. चापेकर चौक परिसरामध्ये श्रद्धांजली आणि निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते.

एकीकडे ही सभा शांततेत सुरू असताना दुसरीकडे चिंचवडच्या वाल्हेकरवाडी परिसरामध्ये एका टोळक्याकडून दुकाने बंद करण्यासाठी व्यापाऱ्यांना दमदाटी करण्यात आली. असाच प्रकार काळेवाडी परिसरामध्ये सुरू असल्याचे समोर आले. कोणत्याही संघटनेच्यावतीने पिंपरी चिंचवड बंदचे आवाहन करण्यात आलेले नाही. मात्र टोळक्याकडून हा प्रकार सुरू असल्याने पोलिसही चक्रावून गेले आहेत. पोलिस या टोळक्याँचा माग काढत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #MarathaKrantiMorcha gang force to close shop in chichwad