#MarathaKrantiMorcha मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक - सुभाष देशमुख

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

पुणे - मराठा समाजाच्या बहुतेक मागण्या मान्य झाल्या असून, त्यांची पूर्तता केली आहे. आरक्षणाच्या मागणीसंदर्भात राज्य सरकार सकारात्मक आहे, असे राज्याचे सहकार व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी येथे सांगितले. 

पुणे - मराठा समाजाच्या बहुतेक मागण्या मान्य झाल्या असून, त्यांची पूर्तता केली आहे. आरक्षणाच्या मागणीसंदर्भात राज्य सरकार सकारात्मक आहे, असे राज्याचे सहकार व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी येथे सांगितले. 

पुण्यात आयोजित ‘गारमेंट फेअर’च्या उद्‌घाटनानंतर देशमुख पत्रकारांशी बोलत होते. मराठा समाजाच्या नेत्यांशी चर्चा करायला सरकार तयार आहे असे नमूद करीत ते म्हणाले, ‘‘मराठा समाजाचे ५८ मोर्चे निघाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी समाजाच्या बहुतेक मागण्या मान्य केल्या. प्रत्यक्षात काही मागण्यांवर अंमलबजावणी केली जात आहे. मराठा समाजातील तरुणांना उद्योग, व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिले आहे. कर्जासाठी तारण ठेवण्याची अडचण मोठी आहे, त्यामुळे विनातारण कर्ज देण्यासंदर्भात परिपत्रक काढले जाईल. शिक्षणात ओबीसींना देण्यात येणाऱ्या सवलती मराठा समाजाला दिल्या जातील.’’

आरक्षणासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा संदर्भ सांगत देशमुख म्हणाले, ‘‘काँग्रेस- राष्ट्रवादी सरकारच्या कालावधीत नारायण राणे यांनी अहवाल तयार केला होता. हा अहवाल घाई-गडबडीत झाल्याचे मत न्यायालयाने नोंदविले होते. या अहवालात स्पष्टता नसल्याने अनेक अडचणी सरकारसमोर आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकार हे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहे. न्यायालयीन काम पूर्ण झाल्यानंतर आरक्षण मिळण्यात काही अडचण नाही.’’

Web Title: #MarathaKrantiMorcha Maratha Reservation Agitation Subhash Deshmukh