बारामती : गेल्या काही दिवसात राज्यात उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर समाजात सलोखा नांदावा या साठी आजपासून बारामतीतून मराठा संवाद यात्रेस प्रारंभ झाला. प्रशांत नाना सातव यांनी मराठा संवाद यात्रेचे आयोजन केले असून बारामतीतून निघून मुंबईला नऊ ऑगस्टला आझाद मैदानात या यात्रेचा समारोप होणार आहे.
सासवड, पिंपरी चिंचवड व नवी मुंबई येथे या यात्रेचा मुक्काम होणार आहे. या यात्रेदरम्यान माहिती पत्रकाचे वाटप होणार असून आरक्षण मोहिमेत शहिद झालेल्यांना आदरांजली अर्पण केली जाणार आहे.

आज बारामतीत शिवाजी उद्यानामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन या संवाद यात्रेचा प्रारंभ झाला. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, तहसिलदार हनुमंत पाटील, अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या
विश्वस्त सुनंदा पवार, माळेगावचे अध्यक्ष रंजन तावरे, माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, दिलीप खैरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी विशेष तयार करण्यात आलेली प्रतिज्ञा सर्वांनी सामूहिकपणे घेतली. या संवाद यात्रेचा उपक्रम समाजात सलोखा निर्माण करण्यासाठी उपयुक्त असल्याचे मान्यवरांनी या प्रसंगी नमूद केले.