पुणे - ‘महाराष्ट्र बंद’चा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला. खबरदारीचा उपाय म्हणून एसटी आणि पुणे महापालिका परिवहन महामंडळाची (पीएमपी) सेवा बंद ठेवण्यात आली होती. रिक्षा, खासगी टॅक्सीचीही किरकोळ वाहतूक सुरू होती. रेल्वे वाहतूक मात्र सुरळीत सुरू होती. बंदमुळे एसटी आणि पीएमपीचे सुमारे पावणेदोन कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

पुण्यातून सुटणाऱ्या आणि पुण्यात येणाऱ्या एसटीच्या ४५०० फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामुळे एसटीच्या पुणे विभागाचे एक कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न बुडाल्याची माहिती एसटीच्या विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिली.
पीएमपीची वाहतूक सकाळच्या सत्रात काही प्रमाणात सुरू होती. मात्र, आंदोलनाला ठिकठिकाणी हिंसक वळण लागल्याने दुपारी एकनंतर पीएमपीची बससेवा पूर्णपणे बंद करण्यात आली. या दरम्यान शनिपार, बिबवेवाडी, लक्ष्मी रोड, मांजरगाव आणि मार्केट यार्ड या ठिकाणी पीएमपीच्या गाड्यांच्या काचा फोडणे, हवा सोडून देणे अशा घटना घडल्या. सातशे पन्नास फेऱ्या रद्द केल्यामुळे जवळपास ७५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती पीएमपीचे जनसंपर्क अधिकारी सुभाष गायकवाड यांनी दिली. शहरातील रिक्षासेवेवरही या बंदचा परिणाम झाला. ओला-उबेर कंपन्यांच्याही गाड्या फोडण्याचे प्रकार घडल्याने सेवा बंद ठेवण्यात आली. शहरात काही ठिकाणी रिक्षा तोडफोडीच्या घटना घडल्या. त्यामुळे दुपारनंतर सर्व रिक्षा बंद होत्या.