#MarathaKrantiMorcha मार्केट यार्डातील व्यवहार ठप्प

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 31 July 2018

पुणे - आरक्षणासाठी सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशन आणि कामगार युनियनने पुकारलेल्या लाक्षणिक बंदला सोमवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजीपाला बाजारात शेतमालाची आवक झाली नाही आणि किराणा भुसार बाजारातील व्यवहारही ठप्प होते.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील भाजीपाला, कांदा-बटाटा, फळ , पान, केळी बाजारात सोमवारी आवक झाली नाही. बाजार बंद ठेवण्यात येणार असल्याने आडतदारांनी शेतकऱ्यांना माल न पाठविण्याच्या सूचनाही केल्या होत्या. त्यानुसार शेतकऱ्यांनी माल पाठविला नाही. तसेच, किरकोळ विक्रेतेही खरेदीसाठी बाजारात फिरकलेच नाही. या बंदमध्ये बाजारातील आडते, कामगार, टेंपोचालक, हमाल, तोलणार, असे सर्वच घटक सहभागी झाले होते. किराणा भुसार बाजारातील कामगार, हमाल या बंदमध्ये सहभागी झाले होते. व्यापाऱ्यांच्या संघटनेकडून बंदसंदर्भात अधिकृत भूमिका घेण्यात आली नव्हती. यामुळे काही व्यापाऱ्यांनी सकाळी दुकाने उघडली होती. कामगार आणि हमालच नसल्याने खरेदी-विक्रीचे व्यवहार दुपारपर्यंत झाले नाही. त्यामुळे दुपारनंतर किराणा भुसार बाजारातील बहुतेक दुकाने व्यापाऱ्यांनी बंद ठेवली.

निर्णय न घेतल्यास बेमुदत संपाचा इशारा
असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी हा बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचे नमूद केले. आरक्षणासंदर्भात योग्य निर्णय घेतला नाही, तर ९ ऑगस्टपासून कामगार बेमुदत संप करतील, असा इशारा कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे यांनी दिला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune marketyard trading stop