बारामतीत एसटी सेवा विस्कळित 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 31 July 2018

बारामती शहर - मराठा आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे शहरासह पुणे जिल्ह्यात निर्माण झालेल्या तणावामुळे दुपारनंतर आज एसटीची वाहतूक विस्कळित झाली होती. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी कमी अंतराच्या बस सुरू ठेवण्याचा निर्णय आगारप्रमुख अमोल गोंजारी यांनी घेतला होता. मात्र पुणे, मुंबईसह लांब पल्ल्याच्या सर्वच गाड्या वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार रद्द केल्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. बारामतीच्या बस स्थानकावर काही काळ बस बंद करण्याचा निर्णय झाल्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण होते.

बारामती शहर - मराठा आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे शहरासह पुणे जिल्ह्यात निर्माण झालेल्या तणावामुळे दुपारनंतर आज एसटीची वाहतूक विस्कळित झाली होती. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी कमी अंतराच्या बस सुरू ठेवण्याचा निर्णय आगारप्रमुख अमोल गोंजारी यांनी घेतला होता. मात्र पुणे, मुंबईसह लांब पल्ल्याच्या सर्वच गाड्या वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार रद्द केल्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. बारामतीच्या बस स्थानकावर काही काळ बस बंद करण्याचा निर्णय झाल्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण होते. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या कारणावरून एसटीने हा निर्णय घेतल्याचे प्रवाशांना सांगितल्यानंतर मात्र बहुसंख्य प्रवाशांनी प्रवासाचा बेत रद्द केला. दरम्यान, जिल्ह्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर बारामतीतही आज महत्त्वाच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी दिली. बारामतीत मात्र सर्व व्यवहार सुरळीत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST services disrupted In Baramati