परदेशी समाजातर्फे शारदीय नवरात्रोत्सव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

पुणे - लाकडाचे व्यापारी असलेल्या परदेशी समाजातर्फे दरवर्षी शारदीय नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. यंदा उत्सवाचे ५१ वे वर्ष आहेत. यात देवीला हरभऱ्याची डाळ, पान, सुपारीचा प्रसाद असतो. गरबा तसेच महिला मंडळाचे भजनही असते, अशी माहिती मैनाबाई को. तुळशीराम परदेशी (छपरबंद) ट्रस्टचे अध्यक्ष विलास परदेशी यांनी दिली. 

परदेशी म्हणाले, ‘‘वर्षभर समाजातर्फे धार्मिक व सामाजिक कार्यक्रमही होतात. वारकऱ्यांना भोजनाची व्यवस्था करतो. समाजाच्या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक व वैद्यकीय मदतही करतो. राजपूत परदेशी समाज हा मूळचा राजस्थानचा. आमच्या अनेक पिढ्या येथे येऊन स्थायिक झाल्या आहेत. धोंडिराम परदेशी, छगन परदेशी यांनी ट्रस्टला दुर्गादेवीची मूर्ती भेट दिली असून, दरवर्षी उत्सवात समाजाचे नागरिक एकत्रित जमतात. रमेश परदेशी, सुरेंद्र ठाकूर, सोमनाथ परदेशी, कुमार परदेशी, ॲड. प्रताप परदेशी आदींच्या माध्यमातून उत्सव साजरा करतो.’

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news navratrotsav by pardeshi society