पांडुरंग हरी... थर्माकोलमुक्त वारी 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 June 2017

पुणे - पालखी सोहळा पुढे गेल्यानंतर रस्त्यावर प्लॅस्टिक पिशव्या आणि थर्माकोलचा कचरा राहतो. याचा ग्रामस्थांना त्रास होऊ नये आणि वारी प्लॅस्टिक पिशव्या, थर्माकोलमुक्त व्हावी म्हणून पुण्यातील काही संस्थांनी पुढाकार घेतला आहे. जमा केलेल्या या कचऱ्यापासून इंधन निर्मिती केली जाणार असून ही पर्यावरणपूरक वारी पुण्यातून माऊलीच्या पालखीसोबत मार्गस्थ होणार आहे. 

थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच आणि कमिन्स इंडिया फाउंडेशनतर्फे प्लॅस्टिक आणि थर्माकोल कचरामुक्त दिंडी पुण्यापासून पंढरपूरपर्यंत काढण्यात येणार आहे. याची सुरवात "सकाळ' कार्यालय परिसरात सोमवारी झाली. यानंतर थर्माकोलपासून इंधननिर्मिती कशी होते, याचे प्रात्यक्षिकही दाखविले. या वेळी मंचाचे अध्यक्ष प्रशांत अवचट, जी. डी. इन्व्हॉरमेंटल प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक अभिजित दातार, अजित गाडगीळ, फाउंडेशनचे संदीप क्षीरसागर, प्रशांत चितळे आदी उपस्थित होते. 

अवचट म्हणाले, ""वारीत प्लॅस्टिक पिशव्या, थर्माकोलचे ग्लास, वाट्या, ताट वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी आम्ही ही पर्यावरणपुरक वारी सुरू करत आहोत. यामुळे प्लॅस्टिक पिशव्या, थर्माकोल रस्त्यावर पडलेले दिसणार नाहीत.'' 

दातार म्हणाले, ""माऊलीच्या पालखीसोबत आम्ही हा उपक्रम सुरू करत आहोत. या उपक्रमाचे यंदाचे हे पहिलेच वर्ष आहे. वारीत होणारा प्लॅस्टिक पिशव्या, थर्माकोलचा कचरा गोळा करून तो "सॉलव्हन्ट'चे मिश्रण असलेल्या ड्रममध्ये वितळवला जाईल. ही प्रक्रिया तातडीने होते. एका ड्रममध्ये प्लॅस्टिक पिशव्या, थर्माकोलचा एक ते दीड ट्रक कचरा वितळू शकतो. हे ड्रम टेम्पोमधून वारीच्या मागे पाठवले जातील.'' एक किलो थर्माकोलपासून 950 मिलिलिटर ऑइल निर्माण होते. याचा औद्योगिक वापरासाठी उपयोग होतो, असेही त्यांनी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pandharpur Wari 2017 pune news