#saathchal पालखीमुळे पुण्यात वाहतुकीत बदल

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 July 2018

पुणे - संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालख्यांचे शनिवारी (ता. ७) शहरात आगमन होत आहे. या पार्श्‍वभूमीवर शहर वाहतूक शाखेने वाहतुकीमध्ये बदल केले आहेत. पालखी दरम्यान काही रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहे, त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पुणे - संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालख्यांचे शनिवारी (ता. ७) शहरात आगमन होत आहे. या पार्श्‍वभूमीवर शहर वाहतूक शाखेने वाहतुकीमध्ये बदल केले आहेत. पालखी दरम्यान काही रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहे, त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पालखी मार्गावरील बंद रस्ते :
संत तुकाराम महाराज पालखी  -

पुणे ते नाशिक फाटा, चर्च चौक, शितळादेवी, बोपोडी, आंबेडकर चौक ते दापोडी, औंध रस्ता, रेंजहिल्स, पोल्ट्री चौकाकडे येणारी वाहतूक, खडकी बाजार ते बोपोडी चौक, मुळा रस्ता ते बजाज उद्यान चौक, खडकी ते बोपोडी चौक, आरटीओ ते इंजिनिअरिंग कॉलेज चौक, सादलबाबा दर्गा ते पाटील इस्टेट चौक.          

संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी -
दिघी मॅगझीन ते आळंदी, वडमुखवाडी ते आळंदी रस्ता, पांजरपोळ चौक, बनाचा ओढा, भोसरी ते महादेव मंदिर दिघी, कळस फाटा ते आळंदी/विश्रांतवाडी चौक, मेंटल हॉस्पिटल कॉर्नर ते आळंदी रोड जंक्‍शन, सादलबाबा दर्गा ते पाटील इस्टेट रोड बंद, चंद्रमा चौक ते आळंदी रस्ता, नवीन आंबेडकर सेतू ते चंद्रमा चौक बंद, होळकर पूल ते चंद्रमा चौक, साप्रस चौक   

संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी एकत्र मार्ग -
रेंजहिल्स चौक ते संचेती चौक (गणेश खिंड रस्ता)
खंडोजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक (फग्युर्सन रस्ता)
तुकाराम पादुका चौक ते बेलबाग चौक 
टिळक रस्ता - पूरम चौक ते टिळक चौक (अलका टॉकीज) 
लक्ष्मी रस्ता - बेलबाग चौक ते टिळक चौक                
शिवाजी रस्ता - जिजामाता चौक ते बुधवार चौक, बेलबाग चौक 
लक्ष्मी रस्ता- संत कबीर चौक, बेलबाग चौक
बेलबाग चौक ते श्री निवडुंग्या विठोबा मंदिर/ पालखी विठोबा मंदिर                        


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #saathchal Changes in traffic due to Palkhi in Pune