#SaathChal एचआयव्ही, एड्‌सबाबत जागृतीसाठी सायकल वारी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जुलै 2018

पुणे - आषाढीसाठी हजारो दिंड्या, पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत. परभणीचे डॉ. पवन चांडक सायकलवरून वारी करून एचआयव्ही, एड्‌सबद्दल जनजागृती करत आहेत. 

पुण्यातून त्यांनी आज (शुक्रवार) सायकल वारीला सुरवात केली असून, पुणे-आळंदी ते पंढरपूर या मार्गावर ते जनजागृती करणार आहेत.आकाश गीते हे त्यांच्या सोबत असून वारीच्या मार्गात विविध संस्था, गावांतील लोकांशी हे दोघे संवाद साधणार आहेत; तसेच एचआयव्ही, एड्‌सबाधित रुग्णांनाही भेटणार आहेत. डॉ. चांडक यांनी ५ वर्षांपासून सायकल वारीदरम्यान जवळपास ४० हजार किलोमीटरचा प्रवास केला असून, या आजारांबाबत जनजागृती केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #SaathChal cycle wari HIV Aids Awakening