#SaathChal पालखी सोहळा सुरक्षेसाठी यंत्रणा सज्ज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

वेळापूर - संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे माळशिरस तालुक्‍यात उद्या (ता. 17) आगमन होत आहे. हा पालखी सोहळा सुरक्षित पार पाडण्यासाठी अकलूज उपविभागातील पोलिस यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी दिली.

श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी मार्गावर माळशिरस तालुक्‍यात 22 बंदोबस्त पॉइंट निश्‍चित केले असून, त्या अनुषंगाने पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी बार्शी व करमाळा उपविभागीय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली गॅमा कमांडो पथक कार्यरत असेल. दर 500 मीटरवर एक कमांडो तैनात असेल. तसेच दुचाकीस्वार कमांडोही वाहतुकीवर लक्ष ठेवतील. पालखी मार्गावर बंदोबस्तासाठी एक सहायक पोलिस निरीक्षक, दोन पोलिस उपनिरीक्षक आणि 60 पोलिस तैनात असतील.

Web Title: #SaathChal palkhi wari Dnyaneshwar tukaram Police security