#SaathChal इंदापुरात संत चांगावटेश्‍वर पालखी सोहळ्याचे स्वागत

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 July 2018

इंदापूर - संत चांगावटेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने बुधवारी (ता. १८) इंदापूरहून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. महंत सेवादास बाबाजी, अध्यक्ष जनार्दन वाबळे महाराज, चोपदार शशिकांत जगताप यांच्या नेतृत्वाखालील या सोहळ्यात अडीच हजार वारकरी सहभागी झाले. तालुक्‍यात ठिकठिकाणी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.

इंदापूर - संत चांगावटेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने बुधवारी (ता. १८) इंदापूरहून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. महंत सेवादास बाबाजी, अध्यक्ष जनार्दन वाबळे महाराज, चोपदार शशिकांत जगताप यांच्या नेतृत्वाखालील या सोहळ्यात अडीच हजार वारकरी सहभागी झाले. तालुक्‍यात ठिकठिकाणी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.

दरम्यान, मंगळवारी डाळज नं. ३ येथे सनी कुंभार व बंधूनी वारकऱ्यांना चहा दिला. पळसदेव ग्रामपंचायतीच्या वतीने पिठलं-भाकरीची न्याहारी देण्यात आली. लोणी देवकर येथे सचिन डोंगरे व सोपान डोंगरे यांनी भोजन दिले. गलांडवाडी नं. १ येथे श्री स्वामी यांनी चहापाणी केले. त्यानंतर सोहळा इंदापूर  येथील सिद्धेश्‍वर मंदिरात विसावला. सिद्धेश्‍वर मंडळाचे अतुलकुमार ढोले, प्रसन्न दुनाखे, प्रमोद भंडारी, नागेश भंडारी, देवा फलफले यांनी महाप्रसाद दिला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप, पुरंदर तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, नीरा बाजार समितीचे संचालक संभाजी काळाणे, सासवडचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, नगरसेवक गणेश जगताप, विश्‍वजित आनंदे, मयूर जाधव, सागर घाडगे, भय्या महाजन, पुणे जिल्हा वारकरी संघाचे उपाध्यक्ष निवृत्ती कुंजीर हे रात्री सुरेश पाटील महाराज यांच्या कीर्तनास उपस्थित होते. या वेळी संजय जगताप यांच्या हस्ते वारकऱ्यांना गुडदाणीचे वाटप करण्यात आले. पालखी सोहळ्याच्या रथास सोपानकाका सहकारी बॅंकेच्या वतीने सासवड ते पंढरपूर अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे.  बुधवारी सकाळी आबासाहेब कामथे, किसन गायकवाड यांनी अभिषेक केला. या वेळी नामदेव चव्हाण यांनी चहा व अल्पोपाहार दिला. त्यानंतर पालखी सोहळ्याचे इंदापूरहून बावड्याकडे प्रस्थान झाले. तत्पूर्वी विठ्ठलवाडी येथे सोपान बोराटे यांनी प्रसादवाटप केले. वडापुरी येथे घनश्‍याम देवकर व ग्रामस्थांनी वारकऱ्यांना न्याहारी दिली. वकीलवस्ती येथे श्रीनिवास कोरटकर, धनंजय कोरटकर, विलास धुमाळ यांनी वारकऱ्यांना भोजन दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #SaathChal palkhi wari sant changavateshwar maharaj