#SaathChal संत तुकाराम महाराज पालखीचे जल्लोषात स्वागत

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 August 2018

पिंपरी - ढोल-ताशांच्या खणखणाटात, रांगोळीच्या पायघड्या घालून जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे परतीच्या प्रवासात पिंपरीगाव येथे मंगळवारी जल्लोषात स्वागत करण्यात आले. ‘ज्ञानोबा.. तुकाराम’च्या गजरात पुणे-मुंबई महामार्गाने पिंपरी येथे दुपारी सव्वाचारच्या सुमारास पालखीचे आगमन झाले.

पालखीच्या पुढे दिंड्या, पाठीमागे तुळशी वृंदावन घेतलेल्या वारकरी महिला, विणेकरी सहभागी झाले होते. गोकूळ हॉटेलसमोर पालखीचे स्वागत करण्यात आले. पिंपरीगाव येथे सायंकाळी सहा वाजता पालखीचे आगमन झाले. समर्थ रंगावलीतर्फे पालखी मार्गावर रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या. संजोग वाघेरे, उषा वाघेरे उपस्थित होते. पिंपरीगावातील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात पालखी मुक्कामी पोचली. तेथे आरती झाली. बुधवारी (ता.८) सकाळी सात वाजता पालखी चिंचवड-आकुर्डीमार्गे देहूसाठी मार्गस्थ होईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #SaathChal palkhi Wari Sant Tukaram Maharaj