#SaathChal वडिलांची सेवा हीच खरी वारी

रघुनाथ दास, तमिळनाडू 
Sunday, 8 July 2018

तमिळनाडूमधील कडैयानल्लूरमध्ये राहत असताना पंढरपूर वारीचा महिमा खूपदा ऐकला. वडील तुकाराम गणपती यांनी इच्छा व्यक्त केली, की एकदा आषाढी एकादशीला पंढरपूरला जायचे. त्यानुसार मी आणि वडील पंढरपूरला आलो. तेथील भाविकांची विठ्ठलभक्ती पाहून मन भारावून गेले. एका श्रद्धास्थानापुढे कसे इतके भाविक नतमस्तक होतात. अनेक प्रश्‍नांनी मनात घर केले होते. पुन्हा तमिळनाडूला घरी गेल्यावर वडील म्हणाले, ‘‘तू संस्कृत शिकून व्याख्याने, प्रवचने किंवा आध्यात्मिक कार्यक्रम करण्यापेक्षा वारकरी संप्रदायाचा अभ्यास कर.’’ तेव्हाच दृढ निश्‍चय केला, की वारकरी संप्रदायाचा अभ्यास करून त्याचा प्रचार व प्रसार करायचा.

तमिळनाडूमधील कडैयानल्लूरमध्ये राहत असताना पंढरपूर वारीचा महिमा खूपदा ऐकला. वडील तुकाराम गणपती यांनी इच्छा व्यक्त केली, की एकदा आषाढी एकादशीला पंढरपूरला जायचे. त्यानुसार मी आणि वडील पंढरपूरला आलो. तेथील भाविकांची विठ्ठलभक्ती पाहून मन भारावून गेले. एका श्रद्धास्थानापुढे कसे इतके भाविक नतमस्तक होतात. अनेक प्रश्‍नांनी मनात घर केले होते. पुन्हा तमिळनाडूला घरी गेल्यावर वडील म्हणाले, ‘‘तू संस्कृत शिकून व्याख्याने, प्रवचने किंवा आध्यात्मिक कार्यक्रम करण्यापेक्षा वारकरी संप्रदायाचा अभ्यास कर.’’ तेव्हाच दृढ निश्‍चय केला, की वारकरी संप्रदायाचा अभ्यास करून त्याचा प्रचार व प्रसार करायचा. आषाढीची पायी वारी करण्याची वडिलांची इच्छा होती. मात्र, त्यांना पायाचा त्रास असल्याने वारीत चालणे शक्‍य नव्हते. इच्छा असतानाही वारीला जाता येत नाही, हा त्यांच्या मनातील भाव ओळखून मी २००७ मध्ये त्यांना घेऊन पहिल्यांदा आषाढी वारीत सहभागी झालो. 

मी परमेश्‍वर महाराज येडशीकर यांच्यासोबत माउलींच्या सोहळ्यात कराडकर दिंडीत चालू लागलो. बाबा महाराज सातारकर यांच्या दिंडीत वडील होते. तेव्हापासून आजतागायत वारी चुकू दिली नाही. त्यानंतर मी बाबा महाराज सातारकर दिंडीत चालू लागलो. वडिलांना पायाचा त्रास असल्याने मी वारीत त्यांची सेवा करतो. मुखाने अभंग म्हणायचे आणि वडिलांचीही वारी घडवायची, हा नित्यनेम अखंडपणे सुरू आहे. बाबा महाराज सातारकर आणि परमेश्‍वर येडशीकर ही माझी स्फूर्तिस्थाने आहेत. 

तमिळनाडूमध्ये घरी विठ्ठलाचे मंदिर उभारले आहे. तेथे दररोज नित्यनेमाने हरिपाठ सुरू आहे. वारकरी सांप्रदायिक शिक्षण देण्यासाठी विद्यालय उभारले आहे. सुटीमध्ये संस्कार शिबिरे घेत आहे. येथील तंजावर विद्यापीठात वारकरी संत असा विषय सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. श्री संत ज्ञानेश्‍वरी, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत हे ग्रंथ तमिळनाडूमध्ये भाषांतरित केले आहेत. यंदा पंढरपूरमध्ये अन्नदान करणार आहे. ज्यांनी जन्म दिला, संस्कार केले, 

त्यांच्याशी आपण ज्याप्रमाणे कर्म करतो, तेच कर्म आपल्या जीवनातही येत असते. त्यामुळे तरुण पिढीने आई-वडिलांची सेवा करावी, जेणेकरून तुम्हालाही ते सुख  अनुभवता येईल. 

(शब्दांकन - शंकर टेमघरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #SaathChal pandharichi wari pandharpur raghunath das article