#SaathChal आई-वडिलांसाठी आजपासून ‘साथ चल’

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 July 2018

पिंपरी - आषाढी वारीनिमित्त ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘फिनोलेक्‍स केबल्स कंपनी’ यांच्यातर्फे आयोजित ‘साथ चल’ या दिंडीची शुक्रवारी (ता. ६) दुपारी चार वाजता निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात औपचारिक सुरवात होणार आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात मुक्कामी पोचल्यानंतर समाज आरती होईल. त्यानंतर ‘आई-वडिलांचा सांभाळ करण्याची’ शपथ भाविकांना दिली जाणार आहे. 

आषाढी वारीनिमित्त संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने गुरुवारी (ता. ५) देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. आळंदी येथून संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा शुक्रवारी प्रस्थान ठेवणार आहे. या सोहळ्यात ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘फिनोलेक्‍स केबल्स कंपनी’ यांच्यातर्फे ‘वारी विठुरायाची अन्‌ आई- वडिलांचा सांभाळ करण्याची’ या संकल्पनेवर आधारित ‘साथ चल’ ही दिंडी सहभागी होणार आहे. त्याची औपचारिक सुरवात संत तुकाराम महाराज पालखी सोहळाप्रमुख, शहरातील पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे. 

हा कार्यक्रम पालखी सोहळा शुक्रवारी पिंपरी- चिंचवड शहरात दाखल झाल्यानंतर दुपारी साडेचार वाजता निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात होणार आहे. ‘साथ चल’ दिंडीचा पहिला टप्पा येथून सुरू होणार आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील सर्वांत शेवटची दिंडी ‘साथ चल’ असेल. पालखी आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात मुक्कामी पोचल्यानंतर समाज आरती होईल. त्या ठिकाणी आई- वडिलांचा सांभाळ करण्याची शपथ घेतली जाणार आहे. 

‘साथ चल’ दिंडीचा पुढील प्रवास शनिवारी (ता. ७) पहाटे पाच वाजता आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरासमोरील कर संकलन कार्यालयापासून सुरू होईल. त्यापुढे दिंडीच्या वाटचालीचे सहा टप्पे असतील. पिंपरी- चिंचवड शहरातील शेवटचा टप्पा फुगेवाडी येथील मेगा मार्टजवळ संपेल. पुण्यातील टप्पा सोमवारी (ता. ९) पूलगेट ते हडपसर गाडीतळ या दरम्यान आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #SaathChal For parents