#SaathChal माउलींच्या पालखीचे आज प्रस्थान

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 July 2018

आळंदी - गळ्यात तुळशीच्या माळा आणि खांद्यावर भगव्या पताका घेत राज्यभरातून आलेल्या साडेचारशेहून अधिक दिंड्यांतील लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत माउलींच्या पालखीचे प्रस्थान पंढरीच्या दिशेने उद्या शुक्रवारी (ता. ६) सायंकाळी होणार आहे. 

आळंदी - गळ्यात तुळशीच्या माळा आणि खांद्यावर भगव्या पताका घेत राज्यभरातून आलेल्या साडेचारशेहून अधिक दिंड्यांतील लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत माउलींच्या पालखीचे प्रस्थान पंढरीच्या दिशेने उद्या शुक्रवारी (ता. ६) सायंकाळी होणार आहे. 

माउलींच्या समाधी मंदिरात पहाटे सव्वादोनला काकडा आरती, पवमान अभिषेक झाल्यानंतर पहाटे चार ते बारापर्यंत माउलींचे समाधी दर्शन भाविकांना खुले ठेवण्यात येईल. नऊ ते अकरा वीणा मंडपात कीर्तन होईल. दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत माउलींच्या नैवेद्यासाठी दर्शनबारी बंद ठेवून समाधी मंदिराचा गाभारा स्वच्छ करून महानैवेद्य दाखविला जाईल. दुपारी अडीच ते साडेतीनच्या सुमारास रथापुढील आणि रथामागील मानाच्या ४७ दिंड्यांना देऊळवाड्यात प्रवेश दिला जाईल. या वेळी एकेक करून चोपदार पोलिसांच्या मदतीने दिंड्या देऊळवाड्यात आत घेतील दरम्यानच्या काळात माउलींच्या समाधीवर ब्रह्मवृंदाच्या वतीने पोशाख चढविण्यात येणार आहे. पोशाखानंतर गुरू हैबतबाबांच्या वतीने माउलींच्या समाधीची आरती, त्यानंतर संस्थानच्या वतीने आरती होईल. त्यानंतर माउलींच्या पादुका प्रस्थानासाठी वीणा मंडपात ठेवलेल्या पालखीत स्थानापन्न करण्यात येतील. या वेळी संस्थानतर्फे मानकऱ्यांना पागोटेवाटप, गुरू हैबतबाबांच्या वतीने दिंडीप्रमुखांना नारळ प्रसाद, माउलींच्या समाधीजवळ संस्थानतर्फे नारळ प्रसाद दिला जाणार आहे. त्यानंतर माउलींच्या पालखीचे वीणा मंडपातून सायंकाळी सहाच्या दरम्यान देऊळवाड्यातून पंढरीकडे प्रस्थान होईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #SaathChal Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi