#SaathChal ‘साठ वर्षांत वारीत खंड नाही’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

पुणे - ‘‘मी साठ वर्षांपासून ज्ञानेश्‍वर माउलींच्या वारीत येत आहे. मी पहिली वारी माझ्या मोठ्या मुलाला खांद्यावर घेऊन केली. आता माझे पणतू शाळेत जातात. दरम्यानच्या काळात कितीही अडचणी आल्या तरी वारीत कधी खंड पडला नाही,’’ असे सांगताना ८० वर्षांच्या राणूबाई आवसकर यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता.

रेणूबाई या परभणी जिल्ह्यातील खामगावच्या रहिवासी आहेत. पतीबरोबर वारीला केलेली सुरवात, पतीनंतरही त्यांनी कायम ठेवली आहे. आषाढी-कार्तिकी अशा वाऱ्या त्या नियमित करतात. वारीत विठ्ठलाच्या नामाचे नामस्मरण केल्याने मनाला समाधान लाभत असल्याचे त्या म्हणाल्या. संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या दिंडीत मागील साठ वर्षांत झालेले बदल सांगताना म्हणाल्या, ‘‘मी पहिल्यांदा वारीला आले तेव्हा एवढे लोक वारीत येत नव्हते, तरुणही वारीत नसायचे. आता आहेत इतक्‍या सोयीसुविधा तेव्हा उपलब्ध नव्हत्या. वारीत येताना अन्नधान्य सोबत घेऊन यावे लागत असे. आता मात्र परिस्थिती खूप बदलली आहे. अन्नदान करण्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

तरुणांसह वारीतील लोकांची संख्या वाढली आहे.’’ जोपर्यंत विठ्ठलाची इच्छा आहे, तो पर्यंत वारी करत राहणार असल्याचे त्या म्हणाल्या.

Web Title: #SaathChal Wari Palkhi Timetable 2018 Ranubai Aavaskar