#SaathChal पालखीमुळे यवत हद्दीतील वाहतुकीत उद्यापासून बदल

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 July 2018

यवत - संत तुकाराम महाराज पालखी सोहळा १० व ११ जुलै रोजी यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीतून जात आहे. या काळात पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आसून, नागरिकांनी त्याची दखल घ्यावी, असे आवाहन यवत पोलिसांनी केले आहे.

यवत - संत तुकाराम महाराज पालखी सोहळा १० व ११ जुलै रोजी यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीतून जात आहे. या काळात पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आसून, नागरिकांनी त्याची दखल घ्यावी, असे आवाहन यवत पोलिसांनी केले आहे.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा १० जुलै रोजी यवत येथे, तर ११ रोजी वरवंड येथे मुक्काम आहे. या काळात पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक इतरत्र वळविण्यात आली आहे. ८ ते १० जुलै रोजी सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी केडगाव-चौफुला येथून पारगाव-शिरूरमार्गे पुणे या रस्त्याचा वापर करावा, तर ११ व १२ जुलै रोजी कुरकुंभ, दौंड, काष्टी, तांदळी, न्हावरा, शिरूरमार्गे पुणे 

अशा पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पुणे-सोलापूर महामार्गाने प्रवास करण्यात नागरिकांना येत असलेल्या अडचणी काही प्रमाणात दूर व्हाव्यात, यासाठी रेल्वेने काही जलद गाड्यांना यवत, केडगाव व पाटस येथे विशेष थांबा देण्याचे नियोजन रेल्वे  प्रशासनाने केले आहे, अशी माहिती रेल्वे प्रवासी ग्रुपचे कार्याध्यक्ष प्रमोद उबाळे यांनी दिली. ९ ते ११ जुलै या तीन दिवसांसाठी जलद गाड्या या तीन रेल्वे स्थानकांवर थांबविण्यात येणार आहेत. दौंडचे आमदार राहुल कुल यांनी रेल्वे प्रशासनास तशी विनंती केली होती. सहायक चालक प्रबंधक सुरेश जैन यांनी त्यास प्रतिसाद दिल्याने प्रवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध झाल्याचे उबाळे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #SaathChal Wari Palkhi Timetable 2018 Transport Changes yavat