Wari 2019 : भक्तीतून एकोपा अन्‌ समाजहिताचे शिक्षण

सचिन शिंदे
रविवार, 30 जून 2019

वारीतील वास्तवादीपणा हाच खरा भक्तीमार्ग आहे. वारीतून अनेक गोष्टी शिकता येतात. त्यामुळे वारीत सहभागी होणे व त्याचा आनंद घेणे हाच खरा सोहळा आहे, जो सगळ्या आनंदापलीकडचा परमोच्च क्षण आहे. 
- प्रल्हाद पोळ, वारकरी, कानसूरकर दिंडी, परभणी

यवत - ‘पालखी सोहळा काय असतो, याची जाणीव होती. मात्र त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतो आहे. एकोपा आणि भक्तीचा समाजहिताला कसा उपयोग करता येऊ शकतो, याची शिकवण पालखी सोहळ्यातून घेतली. वैयक्तिक, कौटुंबिक आणि समाजाच्या हिताचाही विचार पालखी सोहळ्यात शिकता आला,’’ प्रल्हाद पोळ सांगत होता. 

रथापुढच्या दुसऱ्याच दिंडीत अभंगात तल्लीन झालेला प्रल्हाद पोळ याच्याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते. पखवाज वाजवणाऱ्या प्रल्हादचा ठेका अन्‌ अभंगाची लय तल्लीन करणारी होती. अवघ्या विशीतील प्रल्हादची ही पाचवी वारी आहे. 
संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा लोणी काळभोरमधून आज पहाटे मार्गस्थ झाला. पावसाचा हलका शिडकावा होताच अखंड ढगाळ वातावरणात वाटचाल सुरू होती. 

पंढरीच्या वाटेवरील सर्वांत मोठा सुमारे २५ किलोमीटरचा टप्पा आज पार पडला. यवत मुक्कामी पालखी सोहळा आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wari 2019 Palkhi Sohala Aashadhi Wari