Wari 2019 : वीस वर्षांपासून चोपदार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 June 2019

‘रस्त्याच्या कडेने रांगेत चाला, शिस्त पाळा, असे सांगत दिंडीमध्ये शिस्त आणि नियोजन ठेवण्याचे काम हे दिंडीतील चोपदारांचे असते. प्रत्येक दिंडीमध्ये दिंडीतील वारकऱ्यांच्या संख्येवरून चोपदारांची संख्या असते. 

पुणे - ‘रस्त्याच्या कडेने रांगेत चाला, शिस्त पाळा, असे सांगत दिंडीमध्ये शिस्त आणि नियोजन ठेवण्याचे काम हे दिंडीतील चोपदारांचे असते. प्रत्येक दिंडीमध्ये दिंडीतील वारकऱ्यांच्या संख्येवरून चोपदारांची संख्या असते. 

संत तुकाराम महाराज यांच्या दिंडीतील दिंडी क्रमांक ३६ चे शिस्त आणि नियोजनाचे काम चोपदार पांडुरंग पाटील यांच्याकडे आहे. ते हे काम वीस वर्षांपासून पार पाडतात. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्‍वर यांच्या पालखी सोहळ्यामध्ये विविध लहान-मोठ्या दिंड्या सहभागी होतात. प्रत्येक दिंडीचा क्रमांक ठरलेला असतो. प्रत्येक दिंडी शिस्तीत मार्गस्थ करण्याचे काम चोपदारांचे असते. पाटील हे काम गेल्या वीस वर्षांपासून इनामेइतबारे करीत आहेत. या कामात आनंद मिळतो, असे सांगतात.  ते म्हणाले, ‘‘मी करत असलेले काम वारीत शिस्त ठेवण्याचे असून, ती विठ्ठलाची सेवाच आहे. हे काम करणे मला आवडते.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wari 2019 Palkhi Sohala Aashadhi Wari Chopdar Pandurang Patil