esakal | Wari 2019 : भोसरीत वारकऱ्यांना अन्नदान, मोफत उपचार
sakal

बोलून बातमी शोधा

मॅक्‍झीन चौक, दिघी - येथे वसंतराव लोंढे प्रतिष्ठानच्या वतीने दिंडीप्रमुखांना प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण लोंढे यांच्या हस्ते विठ्ठलाची मूर्ती देऊन सन्मानित करण्यात आले.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखीचे मॅक्‍झीन चौकात उत्साहात स्वागत करण्यात आले. परिसरातील राजकीय, सामाजिक संस्था, मंडळांच्या वतीने पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांना नाश्‍ता, उपवासाचे पदार्थ, पाणी, चहा, चप्पलदुरुस्ती, आरोग्यतपासणी, वैद्यकीय उपचार अशा विविध प्रकारच्या सेवा पुरविण्यात येत होत्या.

Wari 2019 : भोसरीत वारकऱ्यांना अन्नदान, मोफत उपचार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भोसरी - संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखीचे मॅक्‍झीन चौकात उत्साहात स्वागत करण्यात आले. परिसरातील राजकीय, सामाजिक संस्था, मंडळांच्या वतीने पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांना नाश्‍ता, उपवासाचे पदार्थ, पाणी, चहा, चप्पलदुरुस्ती, आरोग्यतपासणी, वैद्यकीय उपचार अशा विविध प्रकारच्या सेवा पुरविण्यात येत होत्या.

महेशदादा स्पोर्टस फाउंडेशनद्वारेही वारकऱ्यांना विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी आमदार महेश लांडगेंसह कार्यकर्ते उपस्थित होते. माजी आमदार विलास लांडे व नव महाराष्ट्र तरुण मंडळाच्या वतीने वारकऱ्यांना रेनकोटसह पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी संजय वाबळे, विराज लांडे, उमेश चव्हाण उपस्थित होते. 

वसंतराव लोंढे प्रतिष्ठानच्या वतीने दिंडीप्रमुखांना विठ्ठलाची मूर्ती देऊन सन्मानित केले, तसेच पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी माजी नगरसेवक वसंत लोंढे, प्रवीण लोंढे, कमलाकर काथमोडे उपस्थित होते. भाजप युवा मोर्चाच्या वतीने वारकऱ्यांना पाण्याबरोबरच उपवासाचे राजगिरा लाडू, बिस्कीट, केळीचे वाटप करण्यात आले. या वेळी नगरसेवक रवी लांडगे, भरत लांडगे, संतोष लांडगे उपस्थित होते. संत ज्ञानेश्‍वर मित्रमंडळ व गणेश तरुण मंडळ यांच्या वतीने लाडूंचे वाटप करण्यात आले.

या वेळी लक्ष्मण गवळी, नगरसेवक सागर गवळी, बापूसाहेब काचोळे उपस्थित होते. छावा प्रतिष्ठानच्या वतीने केळी, बिस्किटे वाटप करण्यात आले. जालिंदर शिंदे, कैलाश फुगे, विजय शिंदे उपस्थित होते. 

पुण्यश्‍लोक फाउंडेशनच्या वतीने मोफत वैद्यकीय तपासणी करून औषधवाटप करण्यात आले. डॉ. सत्यवान गडदे, डॉ. धनराज सोळुंकर, डॉ. अश्‍विनी सोळुंकर यांनी तपासणी केली. धनंजय तानले, राजेंद्र गाडेकर, भुजंग दुधाळे उपस्थित होते. लायन्स क्‍लब ऑफ भोजापूर गोल्ड 
आणि शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेद्वारे फराळासह फळवाटप करण्यात आले.

loading image
go to top