Wari 2019 : पिंपरीकरांकडून वारकऱ्यांना सेवा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 June 2019

पिंपरी चिंचवड शहरात जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीदरम्यान विविध संस्था, संघटना, शाळा- महाविद्यालयांनी विविध उपक्रमांतून वारकऱ्यांना सेवा दिली. अन्नदान, फराळवाटप व पालखी मार्गस्थ झाल्यानंतर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

पिंपरी - पिंपरी चिंचवड शहरात जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीदरम्यान विविध संस्था, संघटना, शाळा- महाविद्यालयांनी विविध उपक्रमांतून वारकऱ्यांना सेवा दिली. अन्नदान, फराळवाटप व पालखी मार्गस्थ झाल्यानंतर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 

श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूलमधील स्काउट गाइड विद्यार्थ्यांकडून वारकऱ्यांना फराळ वाटप करण्यात आला. विद्यार्थ्यांनी पालखी मार्गावर स्वच्छता मोहीम राबविली. प्रबंध समितीचे सदस्य जयप्रकाश रांका, प्राचार्य विक्रम काळे, पर्यवेक्षक शशिकांत हुले, एम. एन. मेरूकर, श्रीकांत पाटील उपस्थित होते.

‘प्रतिभा’कडून फळेवाटप
प्रतिभा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमांतर्गत फळे व वडापावचे वाटप करण्यात आले. सचिव डॉ. दीपक शहा, उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे, डॉ. क्षितिजा गांधी, प्रा. अरविंद बोरगे, प्रा. नव्या दंडवाणी, संदीप शहा, तन्वी वैद्य, निखिल महाजन सहभागी झाले.

विश्‍व हिंदू परिषदेकडून आरोग्य सेवा 
विश्व हिंदू परिषद, पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा, सेवा विभागांतर्गत देहू ते पंढरपूरदरम्यान वारकरीबांधवांना मोफत औषधोउपचाराकरिता पाच रुग्णवाहिका व आरोग्य सेवापथकाच्या उद्‌घाटनास महापौर राहुल जाधव, आमदार महेश लांडगे, चिंचवड देवस्थान प्रमुख विश्वस्त ट्रस्ट मंदार देव महाराज उपस्थित होते. प्रसिद्धिप्रमुख मुकुंद चव्हाण, संजय शेळके, नितीन वाटकर उपस्थित होते.

मॉडर्न शैक्षणिक संकुलकडून खाद्य पदार्थ 
यमुनानगर - निगडी येथील मॉडर्न शैक्षणिक संकुलाच्या विद्यार्थ्यांनी फराळ वाटप केले. या वेळी अडीच हजार विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ आणले होते. यासाठी मुख्याध्यापिका गौरी सावंत, तृप्ती वंजारी, सतीश गवळी यांनी मार्गदर्शन केले. या वेळी शरद इनामदार, राजीव कुटे, गंगाधर सोनवणे उपस्थित होते. 

वारकऱ्यांना वेदनाशामक मलम 
निगडी येथील द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडियाच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने वारकऱ्यांना वेदना निवारक मलमाचे वाटप करण्यात आले. 

रेल्वे प्रवासी संघाकडून प्रसादाचे वाटप
रेल्वे प्रवासी संघ पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने प्रसादाचे वाटप करण्यात आले. संघाचे अध्यक्ष इक्‍बाल मुलाणी, उपाध्यक्ष शैलेंद्र पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे एक हजार पाकीट राजगिरा लाडू व पाचशे पाकीट उपवासाच्या चिवड्याचे वाटप करण्यात आले.

मावळा परिवारकडून आरोग्य तपासणी 
आकुर्डी येथे स्टार हॉस्पिटलच्या डॉक्‍टरांकडून मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच औषधी व बिस्कीट वाटप करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन जाधव, आनंद जोरकर, रेवा मोहिते आदींनी सहभाग घेतला.

‘फत्तेचंद’कडून खाऊ वाटप
श्री फत्तेचंद जैन विद्यालयाच्या पाचवी व दहावीच्या स्काउटच्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांना खाऊ वाटप केला. सचिव ॲड. राजेंद्रकुमार मुथा, अनिल कांकरिया, प्राचार्या एस. एस. नवले, एच. एस. लोखंडे उपस्थित होते. 

भोसरीत आरोग्य तपासणी
डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल कॉलेज व साई सेवा ट्रस्टच्या वतीने आरोग्य तपासणी करून औषधेही देण्यात आली. यात डॉ. सुदर्शन लामतुरे, दिव्या मोटवानी, डॉ. अश्विनी रमेश, डॉ. अनुजा सातव यांनी तपासणी केली.

मोफत केश कर्तनसेवा
वारकऱ्यांना महाराष्ट्र नाभिक महामंडळ व सलमानी जमात वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने मोफत केस आणि दाढी कटिंग सुविधा देण्यात आली. गेली अकरा वर्षे ही सुविधा दिली जात असल्याचे जनाधिकार संघटनेचे अध्यक्ष मजीद शेख यांनी दिले. नसीम शेख, रंगनाथ पंडित, श्रीमान करले उपस्थित होते.

पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ निगडी शाखेच्या वतीने वारकऱ्यांना चहा व खिचडीचे वाटप केले. प्रशांत पाटील, सूर्यकांत भोईर, विश्‍वास पाफळे, धुळा हिवरे, नाना येवलेकर, पंडित अहिवळे, पद्‌माकर पाफळे, आदिनाथ भालेकर, राजेंद्र भंडारी, गणेश मोरे, हिरालाल पटेल, बी. के. गोरे, गणेश भिंगारे, संतोष स्वामी, प्रशांत ओव्हाळ, दीपक पाटील, कल्पेश अहिवळे, आकाश भिंगारे, रजनीकांत ओव्हाळ उपस्थित होते.

पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ, चिंचवड विभागातील विक्रेता बंधूकडून  वारकऱ्यांना  सेवा दिली. विभाग प्रमुख मनोज काकडे, उपविभाग प्रमुख अनिल नामदे, विश्वस्त राजू ढमाले, नितीन ठाकूर, सुरेश शिंदकर, गणेश जाधव, कृष्णा पाटील, बाळू गोरे, सुभाष डफळ, महावीर भराटे, दिनेश देवकाते, अनिल दळवी, सुहास भराटे, बंटी भराटे उपस्थित होते.

पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ बोपोडी विभागाच्या वतीने वारकऱ्यांना पाणी बाटली व फराळाचे वाटप करण्यात आले. जितू मोरे आणि औदुंबर काळसाईत, दीपक सरोदे, विजय भालेराव, सिद्धार्थ ओव्हाळ, शकील शेख, सुरेश जाधव, सागर गायकवाड, महेंद्र बडे, विजय तडके, भीमराव वाघमारे, औदुंबर कळसाईत, ज्ञानेश्वर चौधरी, प्रकाश म्हस्के, श्रवण पिल्ले, शरद हजारे, जितेंद्र मोरे उपस्थित होते.

घोरवडेश्‍वर ट्रेकिंग व बालाजी ग्रुप व माजी विद्यार्थी संघटना यांच्या वतीने वारकऱ्यांना खाऊ वाटप केला. दिंडी प्रमुखांना सन्मानित केले. या वेळी राजू पठारे, संजय दळवी, शैलेंद्र शिंदे उपस्थित होते. विश्‍व सिंधी सेवा संगम संस्थेकडून पालखीचे स्वागत करण्यात आले. या वेळी पहेलाज लोकवानी, अजित कंजवानी, नारायण नाथानी, किरण रामनानी, प्रिया सबनानी, मनोहर जेठवानी उपस्थित होते.

दापोडीत वारकऱ्यांची आरोग्य सेवा
जुनी सांगवी - राष्ट्रवादी काँग्रेस दापोडी विभागाच्या वतीने वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी रक्ततपासणी करून औषधे देण्यात आली. या वेळी शेखर काटे, डॉ. वसंत बाराथे, रवींद्र कांबळे यांनी योगदान दिले. रोहितराज युवा प्रतिष्ठानच्या वतीने वारकऱ्यांसाठी मसाज केंद्र उभारण्यात आले होते. 

या वेळी रोहित काटे, अमोल काटे, समीर शेख, करण कणसे, बबलू मुजावर, योगेश रसाळ उपस्थित होते. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मठ व सागरदादा फुगे सोशल फाउंडेशन यांच्या वतीने वारकऱ्यांना पोशाख व साडीचे वाटप करण्यात आले. दापोडीतील विसाव्याच्या ठिकाणी मार्गावर पुष्पवृष्टी करून दिंड्यांचे स्वागत करण्यात आले. 

संजय कणसे, सागर फुगे, यशवंत वाखारे, सुरेश फुगे, मधुकर फुगे, अमोल निचळ, हनुमंत कापसे, धनराज गव्हाणे यांनी योगदान दिले. 
चंद्रभागा भोसले प्रतिष्ठानच्या वतीने टॅंकरद्वारे पिण्याचे पाणीवाटप करण्यात आले. 

दत्तात्रेय भोसले, संजय मराठे, राजेंद्र भोसले, अविनाश भोसले यांनी परिश्रम घेतले. स्वामी विवेकानंद प्रशालेच्या वीर महाराणा प्रताप स्काउट गाइड पथकाने वारकऱ्यांना पाणी व चहाचे वाटप केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wari 2019 Sant Tukaram maharaj Palkhi Sohala Aashadhi Wari