Wari 2019 माउलींच्या दर्शनाने आत्मिक आनंद

Anil-Ghodake
Anil-Ghodake

सासवड - आषाढी वारीत संतांच्या पालख्यांसमवेत लाखो वारकरी चालतात. पुण्यात माउलींच्या पादुकांचे दर्शन घेता आले नाही म्हणून अभियंता अनिल घोडके याने सासवडमध्ये येऊन एक किलोमीटर रांगेत उभे राहून दर्शन घेतले. ‘यातून तुला काय मिळाले,’ असे विचारताच त्याचे उत्तर होते, ‘‘आत्मिक आनंद.’’ त्या वेळी जाणवले, की ही सारी वैष्णवांची मांदियाळी वारीत का चालते...

हडपसरमधील (पुणे) सव्वीस वर्षीय अभियंता अनिल घोडके सासवडच्या पालखीतळावर माउलींच्या दर्शनासाठी सुमारे एक किलोमीटर लांब रांगेत उभा होता. त्याच्याशी संवाद साधला. तो म्हणाला, की घरात वारीची परंपरा नाही; पण सर्वांना वारी आणि माउलींचे आकर्षण आहे. उच्चशिक्षणानंतर नोकरीत व्यग्र असलो तरी, लहानपणापासून हडपसरला न चुकता दरवर्षी माउलींच्या पादुकांचे दर्शन घेतो. मात्र, यंदा गर्दीमुळे ते होऊ शकले नाही, त्यामुळे राहवले नाही. सासवडला दर्शनासाठी आलो. रांग मोठी होती; पण दर्शनाची आस मनात होती. वारीत वारकऱ्यांची कमालीची शिस्त पाहायला मिळते. वर्षानुवर्षे वारकरी आचरणात आणत असलेल्या शिस्तीचे सर्वांनी पालन केले पाहिजे. जीवन जगताना आजही संतविचार प्रेरक आहेत. शिक्षणाबरोबर संतविचाराने जगण्याची ऊर्जा मिळते. शांततामय जीवनासाठी संतांच्या शिकवणुकीची गरज असल्याने वारीत सामील झाले पाहिजे, हीच भावना बहुतांश वारकऱ्यांची होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com