esakal | #SaathChal संत तुकाराममहाराज पालखीचे बारामती तालुक्यात स्वागत
sakal

बोलून बातमी शोधा

Welcome to Sant Tukaram Maharaj Palkhi in Baramati

#SaathChal संत तुकाराममहाराज पालखीचे बारामती तालुक्यात स्वागत

sakal_logo
By
विजय मोरे

उंडवडी : संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्याने आज (ता. 12 ) गुरुवारी सायंकाळी पावणे सातच्या दरम्यान बारामती तालुक्यात प्रवेश केला. पालखी सोहळ्याचे तालुक्याच्या हद्दीत खराडेवाडी गुंजखिळा येथे पंचक्रोशीतील भाविकभक्त व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या भक्तिमय वातावरणात  स्वागत करण्यात आले. यावेळी तालुक्याच्या वतीने बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, प्रांतअधिकारी हेमंत निकम यांनी स्वागत केले.

याप्रसंगी खराडेवाडीचे सरपंच दत्तात्रेय खराडे, अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, भरत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसिलदार हनुमंत पाटील, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे, अधिक्षक अभियंता दत्तात्रेय पडळकर, सहायक पोलिस निरीक्षक विकास बडवे, पंचायत समितीच्या सदस्या निता बारवकर, लिला गावडे, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रवीण आटोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, उंडवडी सुपेचे सरपंच एकनाथ जगताप, उपसरपंच पोपट गवळी, माजी सरपंच बापूराव गवळी आदींसह परिसरातील पदधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

रात्री साडे सातच्या दरम्यान पालखी सोहळा उंडवडी सुपे येथील पालखी तळावर पोचला. येथे उंडवडीकरांच्या वतीने आरती करण्यात आली. पालखी सोहळा तळावर विसवल्यानंतर पंचक्रोशीतील कारखेल, खराडेवाडी, साबळेवाडी, सोनवडी सुपे, देऊळगाव रसाळ, कोळोली, शिर्सुफळ, गाडीखेल आदी गावातील ग्रामस्थांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थांनी पालखीचे दर्शन घेतले. 

दरम्यान, येथे दिवसभर दौंड येथील शिवशक्ती सेवा तरुण मंडळाच्या वतीने वारकऱ्यांना गोड भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. पालखी तळावर पालखी विसवल्यानंतर आरती, प्रवचन किर्तन व भजन आदी कार्यक्रम पार पडले. 

उंडवडीकरांच्या वतीने वारकऱ्यांना रात्रीचे पिट्लं भाकरीच्या भोजनाचा लाभ देण्यात आला. 

वडगाव निंबाळकर पोलिसांच्या वतीने पालखी तळ परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ग्रामपंचायतीच्या वतीने वारकऱ्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे, यासाठी नळ पाणी पुरवठा व टॅंकरची व्यवस्था करण्यात आली. तसेच शौचालय उपलब्ध करुन देण्यात आली होती. 

उद्या (ता. 13) रोजी शुक्रवारी सकाळी पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असून बारामतीत पालखी मुक्कामी असणार आहे.