esakal | Coronavirus : पुणेकरांना जरा जपून... आणखी एक कोरोनाग्रस्त वाढला!
sakal

बोलून बातमी शोधा

1 Coronavirus positive patient found in Pune

पुण्यात आज सापडलेला कोरोनाबाधित रूग्ण हा १४ मार्चला फ्रान्स व नेदरलँडचा प्रवास करून परतला होता. त्यामुळे या रूग्णाला कोरोनाची लागण झाली असावी अशी शक्यता आहे.

Coronavirus : पुणेकरांना जरा जपून... आणखी एक कोरोनाग्रस्त वाढला!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलेले असताना, पुण्यातही कोरोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. अशातच पुण्यात आणखी एक कोरोनाबाधित रूग्ण सापडला आहे. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या ८ वर पोहोचलेली असून, पुणे व पिंपरी-चिंचवड मिळून एकूण १८ कोरोनाबाधित रूग्ण पुण्यात उपचार घेत आहेत. 

Coronavirus : परदेशातून आलेल्यांचे सक्तीने विलगीकरण

पुण्यात आज सापडलेला कोरोनाबाधित रूग्ण हा १४ मार्चला फ्रान्स व नेदरलँडचा प्रवास करून परतला होता. त्यामुळे या रूग्णाला कोरोनाची लागण झाली असावी अशी शक्यता आहे. या रूग्णाला नायडू रूग्णालयात दाखल केलेले असून पुढील उपचार सुरू आहेत, असे पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. कोरोनाबाधितांची ओळख उघड न करण्याचा नियम असल्याने हा रूग्ण पुण्यातील कोणत्या भागातील आहे, याची अद्याप माहिती मिळालेली नाही. आतापर्यंत पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या १८ वर पोहोचली असून महाराष्ट्रात ४२ कोरोनाबाधित रूग्ण सापडले आहेत. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

राज्यातील पहिले कोरोनाबाधित रूग्णही पुण्यातच सापडले होते. त्यामुळे पहिल्यापासूनच पुण्यात कोरोनाबाबत अधिक खबरदारी घेतली जात होती. त्यातच आणखी एक रूग्ण सापडल्याने पुन्हा एकदा काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यातील सर्व आयटी कंपन्यांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना दिल्या आहेत.  

#WeCareForPune कोरोनाला पिटाळण्यास पुणेकर सज्ज!

काल (ता. १७) मुंबईत पहिल्या कोरोनाग्रस्त रूग्णाचा मृत्यू झाला, हा राज्यातील कोरोनाचा पहिला बळी होता. तर देशात कोरोनाचे एकूण ३ मृत्यू झाले आहेत. कर्नाटकात पहिला, दिल्लीत दुसरा तर मुंबईत आतापर्यंत तिसरा बळी गेला आहे. यामुळे सरकारकडून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. गरज असल्यास बाहेर पडा, अन्यथा घरीच राहा अशा सूचना नागरिकांना देण्यात आला आहे.   

loading image
go to top