पुणे - सोलापूर हायवेवर भरधाव कारची कंटरनेरला धडक: 1 जागीच ठार, ४ जखमी

सावता नवले
Saturday, 28 November 2020

कुरकुंभ येथील गिरमेवस्तीजवळ महामार्गावरून सोलापूरकडून पुण्याकडे भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने ( एमएच.  04, जीआर. 4857 ) समोरील कारला ( एमएच. 12, जीएफ. 3722 ) पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात कारमध्ये प्रवास करणारे संजयकुमार पोपटलाल शहा ( वय 60, रा. नवोदय नगर सोलापूर ) गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाले.

 कुरकुंभ(पुणे)  :  पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुरकुंभ ( ता. दौंड  ) हद्दीत भरधाव कंटेनरने कारला पाठीमागून जोरात धडक दिल्याने अपघातात एक जण जागीच ठार तर चार जण किरकोळ जखमी झाले. हा अपघात शनिवारी ( ता. 28) साडेअकराच्या सुमारास घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कुरकुंभ येथील गिरमेवस्तीजवळ महामार्गावरून सोलापूरकडून पुण्याकडे भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने ( एमएच.  04, जीआर. 4857 ) समोरील कारला ( एमएच. 12, जीएफ. 3722 ) पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात कारमध्ये प्रवास करणारे संजयकुमार पोपटलाल शहा ( वय 60, रा. नवोदय नगर सोलापूर ) गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाले. तर सम्राट संजयकुमार शहा, अथर्व सम्राट शहा, दिया सम्राट शहा, कोमल

या प्रकरणी कोमल शहा यांनी पोलिसात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी संजयकुमार शहा यांच्या मृत्यू तर चार जणांच्या जखमी होण्यास आणि वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत ठरलेल्या अज्ञात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर कंटेनरचालक वाहन सोडून पळून गेला आहे.

पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्याची रंगीत तालीम पूर्ण; दिल्लीहून विशेष सुरक्षा पथके दाखल

अपघाताचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखालील मारूती हिरवे, राकेश फाळके, दत्तात्रेय चांदणे, अमोल राऊत करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1 killed and 4 injured as car hits container on Pune-Solapur highway