पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्याची रंगीत तालीम पूर्ण; दिल्लीहून विशेष सुरक्षा पथके दाखल

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 November 2020

सीरम इन्स्टिट्यूटमध्ये उत्पादनाच्या अंतिम टप्प्यात असलेल्या कोरोना लशीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी यांचा नियोजित दौरा शनिवारी होणार आहे.

पुणे : कोरोना लशीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (ता.28) हडपसरजवळील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. त्यानिमित्त शुक्रवारी (ता.११) पंतप्रधानांच्या आगमनापासून परतीच्या प्रवासापर्यंतची रंगीत तालीम करण्यात आली. तर शनिवारी पंतप्रधानांच्या आगमनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. बंदोबस्त आणि सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारीच दिल्लीहून विशेष सुरक्षा पथके शहरात दाखल झाली आहेत. 

इंजिनिअरींगसह सर्व अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार

सीरम इन्स्टिट्यूटमध्ये उत्पादनाच्या अंतिम टप्प्यात असलेल्या कोरोना लशीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी यांचा नियोजित दौरा शनिवारी होणार आहे. सीरममधील एक तासाच्या भेटीसाठी पंतप्रधान पुण्यात येणार आहेत. दुपारी एक वाजता ते लोहगाव विमानतळावर पोचणार आहेत. तेथून ते सीरम इन्स्टिट्युट येथे जाणार आहेत. त्यानिमित्त शुक्रवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास लोहगाव विमानतळ ते सीरम इन्स्टिट्यूट आणि पुन्हा सीरम इन्स्टिट्यूट ते लोहगाव विमानतळ या मार्गावर वाहनांची व सुरक्षिततेची रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी पुणे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी, पोलिस उपायुक्त त्यामध्ये सहभागी झाले होते. बॉम्बशोधक व नाशक पथक (बीडीडीएस), पुणे पोलिसांच्या श्‍वान पथकांकडूनही ठिकठिकाणी तपासणी करण्यात आली. 

पोलिसांतील प्रकरण मिटविण्यासाठी 50 लाखांच्या खंडणीची मागणी 

मोदी यांचे आगमन आणि प्रस्थानासाठी निश्‍चित केलेल्या मार्गावर काही काळासाठी वाहतुकीत तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरामध्ये शुक्रवारी दिल्लीहून विशेष सुरक्षा पथके दाखल झाली आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी लोहगाव विमानतळ, सीरम इन्स्टिट्युट आणि प्रवासाच्या मार्गावर ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त असणार आहे. 

शहरात दोन दिवसांपासून 'कोम्बिंग ऑपरेशन' 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यामुळे पुणे पोलिसांकडून दोन दिवसांपासून शहरात ठिकठिकाणी कोम्बिंक ऑपरेशन राबविण्यात आले. त्यामध्ये तडीपार केलेले गुन्हेगार, अवैध धंदे चालविणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात आली. शहरातील सर्व पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखेच्या पथकांकडूनही ही कारवाई करण्यात आली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special security teams arrived in Pune from Delhi to review security of PM Modi visit