इंदापूरच्या पश्‍चिम भागातील १० जणांनी कोरोनाला असे काही केले की...

राजकुमार थोरात 
Sunday, 12 July 2020

 इंदापूर तालुक्यातील पश्‍चिम भागातील जंक्शन व शेळगावमधील १० रुग्णांनी कोरोनावरती यशस्वी मात केली असून सर्वजण बरे होऊन घरी परतले आहे.

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील पश्‍चिम भागातील जंक्शन व शेळगावमधील १० रुग्णांनी असे काही कोरोनाला तोंड दिले की त्यांच्यातील कोरोना पळून गेला आहे. कोरोनावरती यशस्वी मात करून हे सर्वजण बरे होऊन घरी परतले आहे.

काँग्रेसला बसणार मोठा धक्का? २२ आमदार दिल्लीत 

तालुक्यातील पश्‍चिम भागातील जंक्शन गावातील ५ जणांना कोरोनाची लागण झाली होती.यामध्ये एका महिलेचा, एका ज्येष्ठ नागरिकाचा व तीन युवकांचा समावेश होता. जंक्शनमधील ५ ही रुग्णांनी कोरोनावरती मात केली असून सर्वजण घरी सुखरुप परतले असून यामध्ये कळंब (लालपुरी) च्या रुग्णाचा समावेश आहे.

शेळगावमधील एकाच कुंटूबातील ६ जणांना ही कोरानीच लागण झाली होती.यातील ५ जणांनी कोरोनावरती मात केली असून घरी परतले आहेत.व एकाजणावर उपचार सुरु आहेत.सध्या शेळगावमधील २ रुग्णावर,बोरीमधील एका रुग्णावर व उद्घटमधील ३ रुग्णावरती उपचार सुरु आहेत. उद्घटमधील एका रुग्णाची नोंद इंदापूर तालुक्यात असून उर्वरित दोन रुग्णाची नोंद पुण्यामध्ये आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन...
इंदापूर तालुक्यातील १० रुग्णांनी कोरोनावरती यशस्वी मात केली आहे. नागरिकांनी अत्याआवश्‍यक सेवेसाठी घराचे बाहेर पडावे. सर्व नागरिकांनी मास्क वापरुन स्वत:ची व कुंटूबाची काळजी घेवून प्रशासनाचे नियम पाळण्याचे आवाहन  वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10 citizens in the western part of Indapur free from corona