पुणे बाजार समितीच्या उत्पन्नात तब्बल 'एवढ्या' कोटींची वाढ

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 August 2020

बाजार समितीच्या उत्पन्नात १० कोटी ७० लाखांची वाढ
प्रशासक बी जे. देशमुख यांची माहिती.

मार्केट यार्ड : कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेचे उत्पन्न २०१९-२० मध्ये १० कोटी ७० लाख १३ हजार १८४ रुपयांनी वाढले आहे. विशेषतः बाजार शुल्काच्या माध्यमातून उत्पन्न जास्त वाढले आहे. बाजार शुल्कात  ७ कोटी ६६ लाख ७१ हजार १४३ कोटींनी वाढ झाली आहे.

आॅनलाइनचा नवा फिटनेस फंडा

२०१८-१९ मध्ये समितीचे एकूण उत्पन्न ६३ कोटी ६९ लाख ६१ हजार २३८ रुपये होते. त्यामध्ये वाढ होऊन २०१९-२० मध्ये ७४ कोटी ३९ लाख ७४ हजार ४२२ झाले आहे. बाजार फीच्या उत्पन्नात ७ कोटी ६६ लाख ७१ हजार रूपयांची वाढ झाली आहे. तर देखभाल दुरूस्ती शुल्क आणि इतर गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नात ३ कोटी ३४ लाखाची वाढ झाली असल्याचे बाजार समितीचे प्रशासक बी जे. देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी उपसचिव सतीश कोंडे, सहाय्यक सचिव दीपक शिंदे उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बाजार समिती प्रशासनाने आधी बाजार व्यवस्थित चालवण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे आर्थिक उत्पन्नाबाबत माहिती देण्यास उशीर झाला. टोमॅटो, कांद्यासह शेतीमालाचे भाव घासरलेले होते. तसेच डाळिंब विक्रीवर मोठे परिणाम झाले होते. तरीही बाजार समितीच्या योग्य नियोजनामुळे उत्पन्नात वाढ झाली आहे. कोरोनामुळे ही बाजार समितीच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे.

बाजार समितीचा २०१८-१९ मध्ये ४० कोटी ४३ लाख ५५ हजार महसूली खर्च होता. २०१९-२० मध्ये ५० कोटी ६० लाख ६६ हजार मसूली खर्च झाला आहे. महसूली खर्चात १० कोटी १७ लाख १० हजाराची वाढ झाली आहे. तसेच २०१८-१९ मध्ये बाजार विकास निधी २३ कोटी २६ लाख ५ हजार होता. २०१९-२० मध्ये २३ कोटी ७९ लाख ८ हजार आहे. सन २०१८-१९ मध्ये १९८ कोटीच्या ठेवी होत्या. त्या वाढून २०१९-२० मध्ये २०१ कोटीच्या ठेवी झाल्या आहेत. ठेवीतही ३ कोटीची वाढ झाली असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

पुण्यात रेल्वेे, विमान, रिक्षा, कॅबला परवानगी, पण पीएमपीला

पावनेदोनशे कोटीची मालमत्ता मिळविली- बाजार समिती प्रशासकाचा पदभार स्विकारल्यापासून खेडशिवापूर येथील ५ एकर जमिन, उत्तमनगर येथील ३ एकर जमिन, मोशी येथील ८ एकर जमिन, तसेच मार्केटयार्डातील मॅपकोची ७८ गुंटे जमिन न्यायालयीन व शासन स्तरावर पाठपुरावा करून बाजार समितीला मिळवून दिल्या आहेत. सद्यस्थितीत या जमिनीची एकूण किंमत साधारणतः १७५ कोटीपेक्षा अधिक आहे. बाजार समितीकडे २०० कोटी रुपयांच्या ठेवी असल्यामुळे समितीने कोणत्याही संस्थेकडून एकही रूपयाचेही कर्ज घेतलेले नसल्याचे देशमुख यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10 crore 70 lakhs increase in the income of the market committee in pune