पिंपरी-चिंचवडमध्ये झोपडपट्टी सुधारणांसाठी १० कोटींचा निधी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

अन्य महत्त्वाची कामे

  • प्रभाग दोन व सातमधील झोपडपट्ट्यांमध्ये स्थापत्य विषयक कामे : ९ लाख ३ हजार
  • किवळे एम. बी. कॅम्प : सहा लाख २४ हजार
  • भोसरी एमआयडीसीतील महात्मा फुलेनगर : १० लाख ८८ हजार
  • लांडेवाडीत काँक्रीट रस्ते : १२ लाख ५४ हजार
  • संतोषनगर, विजयनगर, वेताळनगर : सहा लाख ६६ हजार
  • पिंपळे गुरव राजीव गांधीनगर : १३ लाख २३ हजार

पिंपरी - झोपडपट्टी सुधार योजनेअंतर्गत महापालिकेने शहरातील ७१ झोपडपट्ट्यांमध्ये नागरी सुविधा पुरविण्याबरोबरच पायाभूत सुविधा पुरविण्यावरही भर दिला आहे. यासाठी ८८ प्रकारची कामे हाती घेतली असून, त्यासाठी दहा कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याला महापालिका स्थायी समितीने यापूर्वीच मंजुरी दिलेली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अरुंद रस्त्यांवर पेव्हिंग ब्लॉक टाकण्याचे काम सुरू आहे. भूमिगत सांडपाणी वाहिन्या टाकल्या जात आहेत. जुन्या वाहिन्यांची दुरुस्ती सुरू आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती तसेच, नव्याने उभारणी करण्याचे नियोजन आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नवीन जलवाहिन्या टाकल्या जात आहेत. अनधिकृत नळजोड शोधून अधिकृत केले जात आहेत. समाजमंदिरांची दुरुस्ती, रंगरंगोटीची कामेही सुरू आहेत. या कामांना झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन विभागातर्फे प्राधान्य दिले आहे. 

.... आणि तो सुखरूप परतला

पिंपरीसाठी दीड कोटी
भाटनगर, शास्त्रीनगर, महात्मा गांधीनगर, कैलासनगर, गणेशनगर, तापकीरनगर, संजय गांधीनगर, बलदेवनगर, मिलिंदनगर, आदर्शनगर, सुभाषनगर, इंदिरानगरमधील कामांसाठी दीड कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत. त्यात भाटनगरमधील भाट समाज मंदिराच्या नूतनीकरणासाठीच्या १७ लाख ३६ हजार रुपयांचा समावेश आहे. 

क्षेत्रीय कार्यालयनिहाय निधी
अ : ३५ लाख, क : ३१ लाख (मोशीतील संजयनगर, एमआयडीसीतील गवळी माथा, खंडेवस्ती, गणेशनगर, बालाजीनगर, विठ्ठलनगर, आंबेडकरनगर),  ह : २८ लाख (महात्मा फुलेनगर, लांडेवाडी, संजयनगर, जयभीमनगर, गुलाबनगर, सिद्धार्थनगर), फ : २० लाख. 

प्रभाग २ : ४१ लाख (संजय गांधीनगर), प्रभाग ७ : २६ लाख (शांतीनगर), प्रभाग ८ : ४० लाख (बालाजीनगर व गणेशनगर), प्रभाग ९ : ४८ लाख (गांधीनगर, विठ्ठलनगर, आंबेडकरनगर), प्रभाग १० : ४५ लाख (विद्यानगर, दत्तनगर, इंदिरानगर), प्रभाग ११ : १८ लाख, प्रभाग १३ : ६७ लाख (सेक्‍टर २२ मधील मिलिंदनगर, विलासनगर, संजयनगर, राजनगर, दळवीनगर, इंदिरानगर, बौद्धनगर, राहुलनगर, श्रमिकनगर, श्रमशक्तीनगर), प्रभाग १४ : ३७ लाख (जय मल्हारनगर, आंबेडकरनगर, रामनगर), प्रभाग १६ : १८ लाख (अण्णा भाऊ साठेनगर, एमबी कॅम्प), प्रभाग १९ : ३३ लाख (निराधारनगर, आंबेडकर कॉलनी, बौद्धनगर, उद्योगनगर), प्रभाग २० : ६३ लाख (गुरुदत्तनगर, लांडेवाडी, महात्मा फुलेनगर), पिंपरी २१ : १४ लाख, प्रभाग २५ : १७ लाख (काळाखडक), प्रभाग २६ : ७ लाख (अण्णा भाऊ साठेनगर), प्रभाग ३० : १ कोटी ६० लाख (लिंबोरेवस्ती, महात्मा फुलेनगर, जयभीमनगर, संजय गांधीनगर, हिराबाई लांडगे झोपडपट्टी, गुलाबनगर, सिद्धार्थनगर).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10 crore fund for slum improvement in Pimpri Chinchwad