.... आणि तो सुखरूप परतला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

चीनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेला पिंपरी-चिंचवडमधील सारंग शेलार हा विद्यार्थी शहरात सुखरुप परतला आहे. गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोना विषाणूंचा प्रसार वाढला आहे.

पिंपरी - चीनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेला पिंपरी-चिंचवडमधील सारंग शेलार हा विद्यार्थी शहरात सुखरुप परतला आहे. गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोना विषाणूंचा प्रसार वाढला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीनमधून परतलेल्या सारंगची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्याला या विषाणूंची लागण झालेली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून त्याला दोन दिवस वैद्यकीय निरीक्षणाखाली आहे.

सावधान! पिंपरीत सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत सर्वाधिक अपघात

वैद्यकीय शिक्षणासाठी चीनमधील शेनियांग शहरात आठ ते दहा जणांना कोरोना विषाणूंची लागण झाली आहे. त्यामुळे याची भीती आपल्या मनात होती. घरातून बाहेर पडताना मनात ताण आणि भीती असायची. मात्र, वेळेत परत आल्यामुळे डोक्‍यावरील ताण नाहीसा झाला असून सुरक्षित झाल्याचे वाटत असल्याची भावना त्याने व्यक्‍त केली. चीनमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे इथल्या शहरांमधील दुकाने आणि बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. जीवनावश्‍यक वस्तू उपलब्ध होत नसल्यामुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

तडीपार असतानाही वाढदिवस साजरा करण्यासाठी आला अन्...

दरम्यान, चीनमधून परतलेल्या भारतीय नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. त्यांना कोरोना विषाणूंची लक्षणे दिसत नसली तरी त्यांच्यावर पुढील 28 दिवस आरोग्य विभागाकडून नजर ठेवली जाणार असल्याचे राज्य आरोग्य सेवेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: he return back safely