एप्रिल महिन्यात बँका १० दिवस असणार बंद

सणवार, जोडून आलेल्या सुट्या, आर्थिक वर्षांचा पहिला दिवस आणि साप्ताहिक सुट्या यामुळे एप्रिल महिन्यात सर्व सहकारी, खासगी आणि राष्ट्रीयकृत बँका १० दिवस बंद असणार आहेत.
Banks-closed
Banks-closedSakal
Summary

सणवार, जोडून आलेल्या सुट्या, आर्थिक वर्षांचा पहिला दिवस आणि साप्ताहिक सुट्या यामुळे एप्रिल महिन्यात सर्व सहकारी, खासगी आणि राष्ट्रीयकृत बँका १० दिवस बंद असणार आहेत.

पुणे - सणवार, जोडून आलेल्या सुट्या, आर्थिक वर्षांचा पहिला दिवस आणि साप्ताहिक सुट्या (Weekly Off) यामुळे एप्रिल महिन्यात (April Month) सर्व सहकारी, खासगी आणि राष्ट्रीयकृत बँका (Nationalise Bank) १० दिवस बंद (Close) असणार आहेत. यातील तीन अतिरिक्त सुट्या आहेत. त्यामुळे या महिन्यात बँकांचे काम करताना खातेदारांना त्यानुसार नियोजन करावे लागणार आहे. या सर्वांत जोडून आलेल्या सुट्यांच्या आधी व नंतर बँकांत गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

येत्या शुक्रवारी (ता. १) बँकांचा वार्षिक लेखा जोखा असणार आहे. त्यामुळे या दिवशी बँकांचे काम सुरू असेल मात्र ग्राहकांसाठी बँका बंद असतील. त्यानंतर शनिवारी (ता. २) गुढीपाडव्याची सुटी आहे. त्यामुळे बँका शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस (ग्राहकांसाठी) बँका बंद असणार आहे. त्यानंतर १४ एप्रिल रोजी (गुरुवार) डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महावीर जयंती आहे. तर १५ एप्रिल रोजी (शुक्रवार) गुडफ्रायडे आहे. त्यामुळे १४ आणि १५ एप्रिल दरम्यान देखील बँक बंद असतील. गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महावीर जयंती आणि गुडफ्रायडे असे तीन दिवस एप्रिलमध्ये बँकांना अतिरिक्त सुटी असणार आहे. एकूण १० सुट्या व त्या जोडून आल्याने बँकेतील काम लांबणीवर पडल्यास सर्वसामान्यांची गैरसोय होवू शकते.

राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा -

केंद्र सरकारने घेतलेल्या बँक खासगीकरणाच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्मचाऱ्यांनी २८ आणि २९ मार्चला संप पुकारला आहे. त्यामुळे या दिवशी राष्ट्रीयकृत बँका बंद झाल्यास त्याचा परिमाण इतर बँकांच्या कामावर देखील होणार आहे. याचा एकूण फटका खातेदारांना बसणार आहे. कारण अनेक सहकारी बँकांची खाती राष्ट्रीय बँकेत असतात.

एप्रिलमध्ये बँकांना असलेल्या सुट्या :

तारीख- सुटीचे कारण

१ - लेखा जोखासाठी बँका ग्राहकांसाठी बंद

२ - गुढीपाडवा

३ - रविवार

९ - दुसरा शनिवारी

१० - रविवार

१४ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

१५ - गुडफ्रायडे

१७ - रविवार

२३ - चौथा शनिवार

२४ - रविवार

पुढील महिन्यातील सुट्यांच्या विचार करून खातेदारांनी बँकेतील कामाचे नियोजन करावे. तसेच कर भरणाऱ्यांनी तो वेळेत भरावा. कर जमा करण्यासाठी सरकारने मुदत वाढून देण्याची गरज आहे. दंड वाचविण्यासाठी वेळेत कर भरलेले कधीही चांगले.

- ॲड. सुभाष मोहिते, अध्यक्ष, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन

एक एप्रिलला कर्मचाऱ्यांना सुटी नसते मात्र खातेदारांसाठी बँक बंद असेल. पुढील महिन्यातील कामाचे नियोजन सुट्यांनुसार करावे. कारण एक तारखेनंतर बँकांचे लेखा परिक्षण सुरू असते. त्यात कर्मचारी व्यस्त असतात. त्यानुसार खातेदारांनी बँकेत यावे. तसेच शाखेच्या संपर्कात राहून आपली कामे करावीत. बँकिंगच्या नेट बँकींग आणि एटीएमसारख्या इतर पर्यायांचा देखील वापर करावा. सुट्या असल्या तरी नियमित कामकाजावर परिणाम होणार नाही.

- श्रीकांत कारेगावकर, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com