esakal | मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापनाची १० पथके तैनात
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापनाची १० पथके तैनात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : धानोरी, वडगाव शेरी, विश्रांतवाडीसह पुण्याच्या पूर्व भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली त्यामुळे वाहतूक ठप्प झाली, सोसायट्यांचे पार्किंग वस्त्यांमधील घर, दुकानांमध्ये पाणी शिरल्याने हाहाकार उडला. या भागात महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाची १० पथकांनी या भागात मतदतकार्य केले. यामध्ये कोणतीही दुर्घटना घडली नसल्याचे प्रशासनाने सांगितले.

शनिवारी सायंकाळी पुण्याच्या लोहगाव, वडगाव शेरी, धानोरी, हडपसर, फुरसुंगी यासह इतर भागात मुसळधार पावसाला सुरवात झाली. कमी वेळात जास्त पाऊस पडत असल्याने रस्त्यांवरून पाण्याचे लोट वाहण्याचस सुरूवात झाली. अवघ्या अर्ध्या तासात हा परिसर जलमय झाला. सोसायट्यांचे पार्किंग मध्ये चार पाच फुटापेक्षा जास्त पाणी जमा झाले, वाहने पाण्यात बुडाली. महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, येरवडा, टिंगरे नगर, लोहगाव येथेही पावसाचा फटका बसला. रस्त्यावरून तीन चार फुटापेक्षा जास्त पाणी असल्याने वाहतूकीचा खोळंबा झाला.

महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश सोनुने म्हणाले, पूर्व भागात मुसळधार पावसामुळे सोसायटी, वस्तीमध्ये पाणी शिरल्याची माहिती मिळाली. या भागात क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी आमच्या संपर्कात आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाची १० पथके मदत करत आहेत, पंप लावून पाणी बाहेर काढत आहेत. रात्री पाऊस थांबल्यानंतर पाण्याचा निचरा होत आहे. पाणी शिकल्यामुळे कोणतीही दुर्घटना झालेली नाही. आम्ही परस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.

loading image
go to top