खुटबाव - विधानसभा सदस्य झाल्यानंतर पहिल्या १०० दिवसांमध्ये दौंड तालुक्याचा विकासाचा अजेंडा ठेवला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य मंत्रिमंडळांनी दौंडच्या विकासासाठी दिलेल्या भरघोस निधीमुळे या १०० दिवसांचा कार्यक्रम माझ्यासाठी स्वप्नवत झाला आहे. मुळशी धरणाचे दहा टीएमसी पाणी पूर्व भागासाठी वळवणार अशी माहिती दौंडचे आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केले.