दहिवडीतील 10 युवकांनी केले कळसूबाई शिखर पार

नागनाथ शिंगाडे
Monday, 9 November 2020

दहिवडी (ता. शिरूर) येथील ११ युवकांनी महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई शिखर यशस्वीरित्या पार केले आहे.

तळेगाव ढमढेरे : दहिवडी (ता. शिरूर) येथील ११ युवकांनी महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर यशस्वीरित्या पार केले आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेकडील सह्याद्री पर्वतरांगेतील कळसुबाई शिखराची उंची १६४६ मीटर असून, महाराष्ट्रातील एव्हरेस्ट शिखर म्हणून ते ओळखले जाते.  

कळसूबाई शिखर येथील तरुणांनी सलग तीन तासांमध्ये यशस्वीपणे चढाई (ट्रेकिंग) करून सर केले. ही मोहिम आदेश गारगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ११ युवकांनी पार करून पर्यटनाचा आनंद लुटला आहे. गिर्यारोहण करणाऱ्या ११ युवकांचे ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांनी विशेष कौतुक केले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या मोहिमेतील युवकांचा हा आदर्श प्रवास इतरांना प्रेरणादायी ठरला आहे. आदेश गारगोटे, अक्षय गारगोटे, गणेश गारगोटे, अतुल गारगोटे, योगेश गारगोटे, अविनाश गारगोटे, अनिकेत गारगोटे, प्रतिक गारगोटे, वैभव गारगोटे, सिद्धार्थ गारगोटे व बंटी जाधव यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10 youths from Dahivadi crossed Kalsubai peak