
Kamala Nehru Hospital
Sakal
पुणे : महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासोबत संलग्न असलेल्या महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात शंभर खाटा वाढविल्याचा व कार्यान्वित केल्याचा दावा आरोग्य विभागाकडून केला जात आहे. प्रत्यक्षात मनुष्यबळाचा अभाव आणि अपुऱ्या सुविधा यामुळे या खाटा रिकाम्याच आहेत. मात्र, महापालिकेकडून त्या कार्यान्वित केल्याचा दावा केला जात आहे.