esakal | गणेश मंडळाकडून यंदाही प्रशासनाच्या नियमांचे 100% पालन
sakal

बोलून बातमी शोधा

गणेश मंडळाकडून यंदाही प्रशासनाच्या नियमांचे 100% पालन

गणेश मंडळाकडून यंदाही प्रशासनाच्या नियमांचे 100 टक्के पालन

sakal_logo
By
सुषमा पाटील

रामवाडी : गतवर्षा पासुन कोरोनाच्या विळख्यातून अद्याप पूर्णपणे, अशी सुटका झाली नसल्याने सण, उत्सव साजरा करताना नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि सुरक्षितेचा प्रथम विचार करता या वर्षी सार्वजनिक गणेश मंडळानी गर्दी होणार नाही आणि गणेश भक्तांना घर बसल्या दर्शन घेता येईल याची सोय केली आहे. शासन आणि पोलीस प्रशासन यांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनाचे पालन करीत 100 % प्रतिसाद देत चंदननगर , खराडी, वडगावशेरी येथे साध्या पद्धतीने या वर्षी ही मंडळाकडून गणेशोत्सव साजरा केला जात आहे.

चंदननगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत एकूण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे 138 आहे त्यापैकी या वर्षी 118 मंडळाने श्री गणेशाची स्थापना केलेली आहे. महाराष्ट्र शासन आणि पोलीस प्रशासन यांच्याकडून देण्यात आलेले मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करीत गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आव्हान केले होते. या वर्षीही गणेशाची स्थापना ही मंदिरामध्ये ,गणेश मूर्ती ठेवलेल्या केबिनमध्ये , मोकळ्या जागेत ,गर्दी होणार नाही अशा ठिकाणी मंडळाकडून गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. शंभर टक्के प्रतिसाद गणेश मंडळाच्या पदाधिकारीकडून मिळालेला आहे.काही मंडळांनी गणेशाचे दर्शन हे ऑनलाइन पद्धतीने आपल्या भक्तांच्या सोयीसाठी करण्यात आले आहे.

हेही वाचा: मुलांच्या सार्वत्रिक लसीकरणाची अद्यापही शिफारस नाही - नीती आयोग

तसेच सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक, स्वयंसेवक, अग्निशामक यंत्रणा, सामाजिक अंतर राखणे, तोंडाला मास्क लावणे .आरोग्य विभागाने वेळोवेळी केलेल्या अनेक सूचनांचे पालन मंडळाकडून केले जात आहे . सार्वजनिक गणेश मंडळ , सोसायटी यांच्यासाठी कृत्रिम हौद तयार करण्यात आले आहे. मंडळाच्या परिसरात व गणपती विसर्जन वेळी गर्दी होणार नाही यासाठी पोलिसांकडून कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. वरील माहिती चंदननगर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी दिली.

loading image
go to top