esakal | मोठी बातमी : काँग्रेसमध्ये जवळपास १०० मोठे नेते नाराज; हवाय नेतृत्व बदल
sakal

बोलून बातमी शोधा

100 Congress leaders wrote to Sonia Gandhi seeking leadership change claims Sanjay Jha

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जवळपास १०० मोठे नेते नाराज आहेत. त्यांना नेतृत्वात आता बदल हवा असल्याचे काँग्रेस नेतृत्वात बदल व्हायला हवा असे मत काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले संजय झा यांनी व्यक्त केले आहे.

मोठी बातमी : काँग्रेसमध्ये जवळपास १०० मोठे नेते नाराज; हवाय नेतृत्व बदल

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात (INC) जवळपास १०० मोठे नेते नाराज आहेत. त्यांना नेतृत्वात आता बदल हवा असल्याचे काँग्रेस (Congress) नेतृत्वात बदल व्हायला हवा असे मत काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले संजय झा (Sanjay Jha) यांनी व्यक्त केले आहे. यामध्ये काही विद्यमान खासदारांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काँग्रेसमधून हकालपट्टी केल्यानंतर संजय झा यांनी पक्षश्रेष्ठीविरोधात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेसमधील या नेत्यांनी सोनिया गांधींना (Sonia Gandhi) एक पत्र लिहले असून त्यामध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये (All India Congress Committee) पारदर्शी निवडणुका होण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे झा यांनी म्हटले आहे. यापूर्वी काँग्रेस नेते खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनीही काँग्रेस नेतृत्वात आता बदल होण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले होते. काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्षाची गरज असल्याचे त्यांनी म्हटले होते. राहुल गांधी (Rahul Gandhi) काँग्रेस अध्यक्षपद (Congress President) स्वीकारण्यास तयार नसतील तर काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक व्हायला हवी असेही त्यांनी म्हटले होते.

काँग्रेस नेते शशी थरूर यांनी म्हटले होते की, गेल्या वर्षी अंतरिम अध्यक्षाच्या रुपात काँग्रेस अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्याचे आपण सर्वांनी स्वागतही केले होते. परंतु, त्यांच्या आरोग्याचा विचार करता त्यांच्यावर अधिक काळ अध्यक्षपदाचा भार टाकणे हे योग्य वाटत नाही. राहुल गांधी यांनी त्यांचा राजीनामा वापस घ्यायला हवा. ते पुन्हा काँग्रेस अध्यक्ष बनू शकतात. कारण त्यांच्या कार्यकाळ हा २०२२ पर्यंत आहे. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपुष्टात आला आहे.

loading image