Pune | शहरात आज कोरोनाने मारली रुग्णांची 'सेंच्युरी' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Patients
पुणे शहरात आज कोरोनाने मारली रुग्णांची 'सेंच्युरी'

पुणे शहरात आज कोरोनाने मारली रुग्णांची 'सेंच्युरी'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे शहरात मंगळवारी (ता.२३) दिवसभरात कोरोनाचे एक शतक नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून ९० जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील दिवसातील एकूण नवीन कोरोना रुग्णांची संख्या २१० इतकी आहे. जिल्ह्यात दिवसांत दोन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूमध्ये पुणे शहर आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील प्रत्येकी एका मृत्यूचा समावेश आहे.

जिल्ह्यातील दिवसभरातील एकूण नवीन कोरोना रुग्णांत शहरातील १०० रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील ४८, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ४६, नगरपालिका हद्दीतील चार आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील बारा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २६१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण कोरोनामुक्तांमध्ये जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील सर्वाधिक १०२ जण आहेत. शिवाय पुणे शहरातील ९० जणांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील ५३, नगरपालिका हद्दीतील ११ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील पाच जण कोरोनामुक्त झाले आहेत.

हेही वाचा: उद्योजक गौतम पाषाणकर यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

दरम्यान, जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या मंगळवारी पुन्हा एकदा दोन हजारांच्या खाली आली आहे. एकूण सक्रिय रुग्णांपैकी सध्या केवळ ६५७ रुग्णांवर विविध रुग्णांलयात उपचार सुरू आहेत. उर्वरित १ हजार ३१७ जण गृह विलगीकरणात आहेत. दिवसभरात एकूण ९ हजार १६२ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. एकूण चाचण्यांपैकी पुणे शहरातील ३ हजार३८९ चाचण्या आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये २ हजार ४९८, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ३ हजार चार, नगरपालिका हद्दीत २०६ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ६५ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या.

क्षेत्रनिहाय एकूण सक्रिय कोरोना रुग्ण

- पुणे शहर --- ८३६

- पिंपरी चिंचवड --- ३८२

- जिल्हा परिषद कार्यक्षेत्र --- ६२७

- नगरपालिका क्षेत्र --- ९८

- कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्र --- ३१

loading image
go to top